Nashik News : मार्चपासून दळण ५ रूपये किलोने; निफाड तालुक्यातील पीठगिरणी चालकांचा निर्णय

flour mill operator
flour mill operatoresakal
Updated on

ओझर (जि. नाशिक) : पीठ गिरणीच्या स्पेअर पार्टचे दर वाढल्यामुळे १ मार्चपासून ५ रूपये किलो दळण देण्याचा निर्णय निफाड तालुका पीठगिरणी (Flour Mill) संघटनेने घेतला आहे.

याबाबत शनिवारी (ता.१८) येथील कालिका मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Milling at Rs 5 per kg from March Decision of flour mill operators in Niphad nashik news)

निफाड तालुक्यातील गिरणी मालक व कामगारांची बैठक ओझर कालिका माता मंदिरात झाली. माजी आमदार अनिल कदम व महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले. निरंकार सेवा पीठ, मसाला, भात गिरणी कामगार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशचे राज्य अध्यक्ष अशोक सोनवणे उपस्थित होते.

बैठकीत निफाड तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी उमेश रासने यांची एकमताने निवड करण्यात आली‌. सल्लागारपदी सुरेश शेलार (चितेगाव) व असलम पठाण (उगाव खेडे) यांची वर्णी लागली. उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पवार (लासलगाव),

सचिवपदी योगेश जगताप (लासलगाव), कोषाध्यक्ष सुनील शिंदे (लासलगाव), कार्याध्यक्ष पठाण, महासचिव सुरेश व्यवहारे (विंचूर), संपर्कप्रमुखपदी रमेश गायकवाड (निफाड), संपर्कप्रमुख मनोज काळे (सुकेणा), संघटक संजय कुंभार्डे (नांदुर्डी), विजय विष्णू उगले (कारसूळ) यांची निवड करण्यात आली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

flour mill operator
Vande Bharat Express : वंदे भारत रेल्वेला साई भक्त प्रवाशांची प्रतिक्षा!

घरघंटीमुळे गिरणी व्यवसाय अडचणीत आलेला आहे. घरघंटीचा बंदोबस्त करावा व त्यांना कमर्शियल रेट आकारण्यात यावा, इलेक्ट्रिक बिल व स्पेअर पार्टचा भाव वाढले आहेत, त्यामुळे दळण दळण्याचे भाव वाढवून द्यावे, पूर्वी चार रुपये गहू, बाजरी, ज्वारीचे दळण किलोप्रमाणे आकारण्यात येत होते.

परंतु, १ मार्चपासून पाच रुपये किलोप्रमाणे भाव आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. इलेक्ट्रिक बिल मराठी भाषेत व देय तारखेच्या चार दिवस अगोदर देण्याची व्यवस्था महावितरण कंपनीने करावी आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी अशोक सोनवणे प्रयत्न करीत आहेत. जितू जाधव यांनी आभार मानले. बैठकीला साडेतीनशेहून अधिक गिरणी कामगार उपस्थित होते.

flour mill operator
Shiv Jayanti 2023 : इंदिरानगर येथे शिवरायांचा 51 फूट उंच थ्रीडी देखावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.