Nashik News : तळेगाव डॅमच्या सांडव्यात लाखो मासे मृत; नागरिकांसह जनावरांचे आरोग्य धोक्यात

Dead fish floating in the spill due to chemicals.
Dead fish floating in the spill due to chemicals.esakal
Updated on

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तळेगाव शिवारातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या डॅमच्या सांडव्याच्या पाण्यात अज्ञातांनी केमिकल टाकल्याने पाण्यावर तेलाचा तवंग तयार झाला आहे. त्यामुळे लाखो मासे व हजारो खेकडे मृत्युमुखी पडले आहेत. (Millions of fish dead in Talegaon Dam spill Health of animals along with citizens at risk Nashik News)

ज्या बाजूने हे पाणी वाहत जाते, त्या बाजूच्या शेतातील गवत आणि गावठी पालेभाज्या काळ्या पडल्या आहेत. याच पाण्याचा वापर शहरातील व परिसरातील वाड्यपाड्यातील नागरिक व गुरांना पाणी पाजण्यासाठी, कपडे धुण्यासाठी वापर करतात.

या पाण्याच्या वापराने धुतलेले कपडेही काळे पडले असून त्यात एक विशिष्ट प्रकारचा उग्र वास येत आहे. या सांडव्याचे पाणी आदिवासी पाड्यातील ६ ते ७ विहिरीत झिरपत असल्याने आदिवासी पाडयांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

विशेष म्हणजे पुढे हेच वाहते पाणी घाटनदेवी मंदिरासमोरील उंटदरीमार्गे शहापूर तालुक्यातील भातसा धरणास जाऊन मिळत आहे. त्यामुळे भातसा धरणाचे पाणीही दूषित होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Dead fish floating in the spill due to chemicals.
Dhule Crime News : देशी गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद; 5 रिकामी काडतुसे जप्त

नगरपरिषदेवर प्रशासक असून अधिकारी सतत नाशिकला बैठक व इतर कामांमध्ये गर्क असून शहराला व नागरी विकासाला खीळ बसली आहे. नगर परिषद तलाव व तळेगाव डॅम या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक घटना होताना दूषित पाणी नागरिकांना पिण्याच्या वापरात आल्याने साथीच्या रोगांचा फैलाव शहरात पसरला आहे. दुसरीकडे

नगर परिषदेकडे कुशल व अनुभवी कामगार नसल्याने पाणी शुद्धीकरणही केले जात नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. प्रशासकपदी विराजमान असलेले प्रांताधिकारी व मुख्याधिकारी हे अधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने शहराच्या समस्यांप्रश्‍नी पुन्हा एकदा शहर बंद आंदोलन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

"नगरसेवक व लोकप्रतिनिधी कार्यकाल संपल्यामुळे प्रभागातील व शहरातील विविध समस्याबाबत नगरपरिषदेत प्रशासन अधिकारींनी व मुख्याधिकारींनी जनतेच्या समस्या व नागरी सुविधांबाबत जनता दरबार घ्यावा व लोकसंवाद साधून सुविधा द्याव्या."- रमेश शिंदे, ज्येष्ठ नागरिक.

Dead fish floating in the spill due to chemicals.
Market Committee Election : मालेगावला 18 जागांसाठी 202 उमेदवारी अर्ज; तिसऱ्या पॅनलची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.