नाशिक रोड : डिजिटल रुपीमुळे सध्या बँक कर्मचाऱ्यांसह देशभरात असलेले नोटांच्या प्रेसचे कर्मचारी असे लाखो लोक बेरोजगार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. १ डिसेंबरला सरकारने डिजिटल रुपयाचा (सीबीडीसी) पायलट प्रोजेक्ट मुंबई, दिल्ली, बंगलोर, भुवनेश्वर या महानगरांत सुरू करून देशात संपूर्ण नोटाबंदीच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. यामुळे बेरोजगारीत वाढ होणार असून, सायबर क्राइम वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. ( Millions of people will unemployed due to RBIs digital currency Nashik News)
डिजिटल क्रांती जशी होते आहे तसे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. विशेष करून बँकिंग, कॉमर्स, किमान कौशल्य क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या नवतरुण मुला-मुलींना यामुळे संधी मर्यादित असणार आहे. नाशिकमधील काही बॅंक अधिकाऱ्यांना डिजिटल रुपीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
डिजिटल रुपयाचा वापर वाढल्यावर नाशिकसह देशातील इतर प्रेस नोटांमध्ये नोट छपाई कमी होणार आहे. नोटप्रेसमधील हजारो कामगार व बॅंक कर्मचाऱ्यांचा रोजगार धोक्यात आला आहे. डिजिटायझेशन आणि ऑनलाइन व्यवहारामुळे सायबर क्राइम वाढून नागरिकांना फटका बसणार आहे. त्यामुळे प्रेस कामगार नेत्यांनी रुपी या डिजिटायझेशनला विरोध दर्शविला आहे.
डिजिटल रुपी म्हणजे काय?
अनेक लोकांना डिजिटल रुपी माहीत नाही. अनेक लोक संगणक आणि मोबाईल साक्षर नाहीत, तरीही सरकार डिजिटल रुपी रुजविण्यासाठी आतापासून सुरवात करत आहे. रिझर्व्ह बॅंकेने देशाचा पहिला रिटेल डिजिटल रुपी (सीबीडीसी-सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी) लागू करण्याची घोषणा केली आहे. फोन पे, गुगल पे यांसारखे त्याचे कार्य राहील. मात्र, त्याला इंटरनेटची गरज नाही.
डिजिटल रुपीवर रिझर्व्ह बॅंकेचे संपूर्ण नियंत्रण राहील व डिजिटल रुपी हे वॉलेटद्वारेच कार्यरत राहील. फोन पे, गुगल पे, भीम अप, पेटीएम वापरता येत नसलेले नागरिकही या वॉलेटचा वापर करू शकतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांना रोख रक्कम बाळगावी लागणार नाही. ज्याला पेमेंट करायचे त्याच्या खात्यात लगेच पैसे जमा होतील. त्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
प्रेस कामगार बँकांचे कर्मचारी अडचणीत
डिजिटल रुपीचा शंभर टक्के वापर सुरू झाल्यावर संपूर्ण नोटाबंदी होईल, असा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. भारतात नोटांची छपाई ही नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल), म्हैसूर (कर्नाटक) येथे होते. आधुनिकीकरणामुळे चार प्रेसमध्ये मिळून सात हजारच कर्मचारी राहिले आहेत. डिजिटल रुपीमुळे नोटप्रेसपुढे बेरोजगारीचे मोठे संकट उभे राहणार आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलांसमोर बेरोजगारीचे संकट उभे राहू शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.