Diwali Festival : गंगाघाटावर दिवसभर ‘फुल’ कोंडी; झेंडूच्या बाजारात लाखोंची उलाढाल

Marigold
Marigold esakal
Updated on

नाशिक : तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर लक्ष्मीपूजनासाठी अवघी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. लक्ष्मीला प्रिय असलेल्या झेंडूच्या फुलांची गंगाघाटावर मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने गंगाघाटावरील गौरी पटांगणासह, पंचवटी कारंजा, दिल्ली दरवाजा, नाव दरवाजा, गणेशवाडी, सरदार चौक, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा भागांत दिवसभर वाहतुकीची कोंडी अनुभविण्यास मिळाली. दरम्यान, लक्ष्मीपूजनासाठी गंगाघाटावरील फुल बाजारात लाखो रुपयांच्या झेंडूच्या फुलांची विक्री झाली. (Millions of turnover in marigold market on Diwali festival 2022 nashik news)

रविवारी पहाटेपासून फुल उत्पादक शेतकऱ्यांची वाहने गंगाघाटावर येण्यास सुरवात झाली. ही आवक दिवसभर सुरूच होती. फुले खरेदीसाठी अनेकजण चारचाकी, दुचाकी घेऊन आल्याने वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडली. विशेष म्हणजे याठिकाणी सुरवातीला वाहतूक शाखेचा पोलिस कर्मचारी नसल्याने कोणीही कुठेही वाहने उभी करीत होते. त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडली. काही वेळाने पोलिस कर्मचारी दाखल झाले.

मात्र, मोजके पोलिस व वाहनांची संख्या प्रचंड यामुळे कोंडीत अधिकच भर पडत गेली. गर्दीत अडकायला नको, म्हणून अनेकांनी वाहने इतरत्र वळविली. त्यामुळे सरदार चौक, दिल्ली दरवाजा, नाव दरवाजा, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल आदी भागांतही वाहतुकीची मोठी कोंडी झाली.

Marigold
SAKAL Impact : चैनस्नॅचर्सविरोधात सिडकोत कडेकोट नाकाबंदी

फुलबाजारात लाखोंची उलाढाल

दीपोत्सवासाठी गेल्या तीन ते चार दिवसांपासून गंगाघाटावरील फुल बाजारात मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक झाली आहे. मात्र, फुलांपेक्षा झेंडुलाच अधिक मागणी होती. सकाळी अडीचशे ते तीनशे रुपयांत मिळणाऱ्या फुलांच्या क्रेटचा भाव सायंकाळी कमी होऊन तो दोनशे रुपयांवर स्थिरावला. नाशिक तालुक्यासह शेजारील अनेक फुल उत्पादक गंगाघाटावर दाखल झाले. खरेदीदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने दिवसभरात लाखो रुपयांच्या झेंडूच्या फुलांची विक्री झाली.

भुरट्यांची पर्वणी

लक्ष्मीपूजनासाठी गंगाघाटावर झेंडूची फुले विक्रेत्यांसह खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. ही पर्वणी साधत भुरट्या चोरट्यांनी अनेकांची पाकिटे लंपास केली. एवढेच नव्हे, तर गर्दीचा फायदा घेत अनेक फुल उत्पादकांची फुलांची गाठोडीही गायब झाली. त्यामुळे अनेक विक्रेते एकमेकांना काळजी घेण्याचे आवाहन करीत होते.

Marigold
Nashik Crime News : मखमलाबाद शिवारात टोमॅटोची चोरी; शेतकरी ‘भुरट्यां’मुळे त्रस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.