Nashik News: विद्युत वाहिनीचे मिनी पिलर उघडे! महावितरणाचा भोंगळ कारभार

Open Mini Pillars near Shiran Society.
Open Mini Pillars near Shiran Society.esakal
Updated on

Nashik News : अंबड येथील परिश्रम सोसायटी येथे रस्त्यालगत असलेले महावितरणचे मिनी पिलर उघडे असून यामुळे महावितरण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. नाशिक शहरात उघड्या विद्युत डीपीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

तरी प्रशासनास जाग येत नाही का असा संतापजनक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. (Mini pillar of electric channel open Poor administration of Mahavitran Nashik News)

उघड्या विद्युत डीपीमुळे विजेचा धक्का लागून लहान-मोठ्या दुर्घटना नेहमीच घडत असतात. दुर्दैवाने दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनास नेहमीप्रमाणे जाग येईल काय असा सवाल येथील नागरिक विचारत आहे.

येथील स्थानिक रहिवाशांनी या उघड्या मिनी पिलर बाबत वेळोवेळी वीज वितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सांगून देखील याकडे काणाडोळा केला जात आहे.

सिडको परिसरात अनेक ठिकाणी महावितरणचे मिनी पिलर डीपी हे उघडे असून त्यांचे झाकण चोरीला गेले आहेत. पिलर व डीपी याला झाकण नसल्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Open Mini Pillars near Shiran Society.
NMC Commissioner Appointment : आयुक्त पदासाठी भाजप-शिंदे गटात रस्सीखेच!

मिनी पिलरच्या ठिकाणी लहान मुले तसेच, भटके जनावरे यांचा डीपीला चुकून स्पर्श झाला तर मोठी दुर्घटना होऊ शकते. मोठी दुर्घटना झाल्यास यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी उघडे असलेले मिनी पिलर त्वरित बंदिस्त करावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.

"आमच्या सोसायटीलगत असलेल्या महावितरणचे मिनी पिलर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उघड्या अवस्थेत आहे, त्याचे झाकण चोरीला गेलेले आहे. या ठिकाणी लहान मुले खेळत असतात चुकून मिनी पिलरला धक्का लागल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. आम्ही अनेकदा महावितरणच्या संबंधित वायरमन यांना सांगून देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे."

-गणेश चातारकर, स्थानिक रहिवासी

"येथील रहिवाशांनी वेळोवेळी महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत तक्रारी केल्या आहेत. एखादा अनुचित प्रकार घडल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरत यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करायला हवी." - गोकुळ दातीर

"संबंधित ठिकाणी तत्काळ वायरमनला पाठवून माहिती घेतो, मिनी पिलर उघडे असेल तर त्या ठिकाणी त्वरित झाकण बसविण्यात येईल."- हेमंत भिरूड, सहाय्यक अभियंता महावितरण

Open Mini Pillars near Shiran Society.
Ultraman: अल्ट्रामॅन डॉ. सुभाष पवारांचा मेक्सिकोत डंका! वयाच्या 67व्या वर्षी स्पर्धा पार करणारे एकमेव भारतीय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.