Phalke Smarak : मिनी थिएटर, कलादालन नावालाच; चित्रपटमहर्षींच्या नावाचे स्मारक उरले फक्त खेळण्यासाठी!

Closed Booking Office of Phalke Memorial Museum & Mini Theater
Closed Booking Office of Phalke Memorial Museum & Mini Theateresakal
Updated on

किरण कवडे : सकाळ विशेष

Phalke Smarak : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने महापालिकेने सुरू केलेल्या फाळके स्मारकातील मिनी थिएटर, दोन कलादालने नावालाच उरले आहेत. तर फोटोतून चित्रपटांचा प्रवास उलगडणाऱ्या संग्रहालयास दरवाजाच नसल्यामुळे पशू, पक्षी व प्राण्यांचा येथे मुक्त संचार आहे.

त्यामुळे फाळके स्मारक आता केवळ लहान मुलांना खेळण्यासाठीच उरले असून, कलादालनांवर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येते. (Mini theatre Kaladalan monuments of film Maharshi dadasaheb phalke become playground nashik news)

महापालिकेने कोट्यवधी करत २००१ मध्ये नाशिक, मुंबई महामार्गावर फाळके स्मारक उभारले. २५ एकराच्या निसर्गरम्य परिसरात पशू, पक्ष्याचा वावर असल्यामुळे शहराच्या दगदगीपासून दूर शांततेच्या ठिकाणी आल्यासारखे वाटते.

येथे येणाऱ्या नागरिकांना निसर्गाचा आनंद तर मिळावाच शिवाय मिनी थिएटर, कलादालनाच्या माध्यमातून कलेचा आनंद मिळावा यासाठी दोन कलादालने सुरू केली. यापैकी एकही कलादालन सध्या सुरू नाही.

विशेष म्हणजे चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो, त्या दादासाहेब फाळके यांनी सुरू केलेल्या चित्रनगरीचा प्रवास सांगणाऱ्या संग्रहालयास एका बाजूने दरवाजाच राहिलेला नाही. त्यामुळे ‘आवो जावो घर तुम्हाला’ अशी अवस्था झाली आहे.

कलादालनावर महापालिकेने केलेला खर्च वाया गेला असेच म्हणावे लागेल. येथे फक्त भिंती उभ्या दिसतात. आवारात कुत्र्यांचा वावर दिसून येतो. सुरक्षारक्षक हे येणाऱ्या नागरिकांची काळजी घेतात. पण येणाऱ्या रसिकांना बघण्यासारखे काहीच नसल्यामुळे फक्त किशोरवयीन मुलेच या स्मारकात 'रमलेली' दिसतात.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Closed Booking Office of Phalke Memorial Museum & Mini Theater
Panchavati Express : पंचवटी एक्स्प्रेसमध्ये गुदमरतोय प्रवाशांचा जीव!

कलारसिकांची नाराजी

फाळके स्मारकातील कलादालने बंद असल्यामुळे येथे येणाऱ्या कलारसिकांच्या पदरी निराशा पडते. निसर्गाच्या सानिध्यात वावरताना त्यांना कलेचा आस्वाद मिळेल या अपेक्षेपोटी सुरु करण्यात आलेल्या कलादालनांची ही अशी अवस्था बघितल्यानंतर कलारसिक लागलीच काढता पाय घेतात. मग महापालिकेने एवढा अट्टहास कशासाठी केला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

फाळके स्मारकाची वैशिष्ट्ये

*२५ एकराचा निसर्गरम्य परिसर
*लहान मुलांना खेळण्यांसह कारंजा, विविध पक्ष्याचा आवाज कानी पडतो
* कोरोनापूर्वी लेझर शो, लावणी नृत्यासह कलादालनेही सुरु होती
* कलारसिकांना शांत वातावरणात कलेचा आनंद घेता येतो
* येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिचे नाव व मोबाईल नंबर नोंदवला जातो

स्मारकातील दोष

*स्मारकाच्या कानाकोपऱ्यात भलत्याच 'फुलांना' बहर आलेला दिसतो
*खेळण्यांव्यतिरीक्त संग्रहालय, मिनी थिएटर, कलादालन बंद
* प्रेक्षकांना ऑफलाइनच तिकीट घ्यावे लागते
* ऑनलाइन पैशांचा स्वीकार होत नाही
*पाण्याअभावी नैसर्गिक झरे, विहीर आटलेली दिसते
* लावणी नृत्य, चित्रपटातील गाण्यांच्या लेझर शो बंद

Closed Booking Office of Phalke Memorial Museum & Mini Theater
Nashik Transfers : नाशिक विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()