Chhagan Bhujbal News : ओबीसी समाज कर्मकांडात आजही गुरफटलेला : मंत्री छगन भुजबळ

chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal
Updated on

Chhagan Bhujbal News : विज्ञाननिष्ठ विचारांची शिकवण देणारे महात्मा जोतिराव फुले यांचा अनुयायी असलेला ओबीसी समाज आजही कर्मकांडामध्ये गुरफटलेला दिसतो. हजारो महिला एकाच वेळी देवापुढे नतमस्तक होतात.

पण, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेचा या महिलांना आज विसर पडला आहे, अशी खंत व्यक्त करीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक समाजाची चळवळ जीवंत ठेवण्यासाठी विचारांची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचे आवाहन केले. (Minister Chhagan Bhujbal statement about OBC community nashik news)

सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा. हरी नरके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नाशिक येथे पार पडले. या अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी स्वागताध्यक्ष विश्वासराव मोरे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे, विजय राऊत, समाधान जेजूरकर, अरविंद खैरनार, अशोक मंडलिक, शिवा बागूल, निवृत्ती बोराटे, अशोक सोनवणे, आप्पा जगताप उपस्थित होते.

या वेळी मंत्री भुजबळ म्हणाले, की महात्मा फुले यांनी मांडलेल्या सत्यशोधक चळवळीत विचारांची आजही समाजाला तितकीच आवश्यकता असून, हे अधिवेशन त्यासाठी अतिशय उपयोगी ठरेल. समाजाच्या आमूलाग्र मौलिक परिवर्तनाकरिता हिंदू समाजरचनेतील माणसांना उच्च-नीच मानणारा जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती घडविण्याकरिता महात्मा फुले यांनी समाजातील काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ ला पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

आज दीड शतकानंतरही महात्मा फुले यांनी लावलेली ही ज्योत अंधारलेल्या दिशांना उजेडाची मशाल बनून उभी असल्याचे त्यांनी सांगितले.

chhagan bhujbal
Chhagan Bhujbal News : कृषी टर्मिनल मार्केटसाठी जागा हस्तांतरणाचे निर्देश : छगन भुजबळ

महात्मा फुले यांनी गुलामगिरी, अस्पृश्यता, स्त्री दास्य, जनावरांची हत्या याला विरोध केला. व्यसनापासून दूर राहावे, अशी शिकवण त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दिली. सत्यशोधक समाजाची ही चळवळ ब्राह्मणांच्या विरोधात नव्हती; तर ब्राह्मण्यवादाच्या विरोधात होती.

सत्यशोधक समाजाचा केवळ सामाजिक सुधारणा हा हेतू नव्हता; तर लोकप्रबोधन, शिक्षण सुधारणा, शेतकरी हित, सावकारी उच्चाटन यासह अनेक प्रश्नांवर काम केले. महात्मा फुले यांनी मांडलेला शेती विज्ञानवादी विचार हा अतिशय महत्त्वाचा असल्याचे भुजबळांनी सांगितले. या वेळी ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला.

मराठा आरक्षणाला विरोध नाही; पण...

ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नसून, त्यांना स्वतंत्ररीत्या आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसी समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवून इतरांना आरक्षण द्यावे, अशी मागणी मंत्री भुजबळ यांनी केली.

chhagan bhujbal
Chhagan Bhujbal News: गरीब कुटुंबाचा गणेशोत्सव होणार गोड : छगन भुजबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.