Chhagan Bhujbal : द्वारका सर्कल येथे मुंबई नाक्याप्रमाणे सिग्नल यंत्रणा : मंत्री छगन भुजबळ

मुंबई नाका येथे वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्कल कमी करण्याबरोबरच सिग्नल यंत्रणा बसविली जात आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

Chhagan Bhujbal : मुंबई नाका येथे वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्कल कमी करण्याबरोबरच सिग्नल यंत्रणा बसविली जात आहे. त्याच धर्तीवर द्वारका सर्कल येथील वाहतुकीची वर्दळ कमी करण्यासाठीही वाहतूक बेट हटवून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करायला हवी, अशी अपेक्षा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

संदर्भात यंत्रणेला सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Minister Chhagan Bhujbal statement of Signal system at Dwarka circle like Mumbai bridge nashik news )

‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त भुजबळ यांनी सातपूर कार्यालयाला भेट दिली. यावेळी शहरातील विविध विकासकामांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर चर्चा झाली. मुंबई नाका येथे सध्या वाहतूक बेट कमी करण्याचे काम सुरू आहे. त्या कामाचे भुजबळ यांनी स्वागत केले.

मुंबईकडून द्वारकाकडे जाताना वाहतूक बेटाला मोठा वळसा घालून पुन्हा महामार्गावर यावे लागत होते. परिणामी शहराकडून येणारी वाहतूक ठप्प होते. मात्र आता वाहतूक बेट कमी करण्याचे काम सुरू आहे. लवकरच तेथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे, त्यामुळे मुंबईकडून येणारी वाहतूक बेटाला वळसा न घालता सरळ महामार्गाने मार्गस्थ होईल. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण घटेल.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक

मुंबई नाक्याप्रमाणेच द्वारका सर्कल येथेही उपाय योजनेची गरज आहे. मुळात द्वारका सर्कल वाहतूक बेटाची सध्यातरी गरज नाही. वाहतूक बेट हटवून फक्त सिग्नल ठेवल्यास वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण कमी होऊन प्रवास सुखकर होईल. वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा असली तरी त्या व्यतिरिक्त सात ते आठ वाहतूक पोलिस येथे वाहतूक नियंत्रणासाठी ठेवावे लागतात. त्यामुळे सर्कलचा घेर कमी ठेवा किंवा सर्कल नसले तरी चालेल, असे भुजबळ यांनी सुचविले.

पुणे महामार्गाचे विस्तारीकरण लवकर व्हावे

नाशिक-पुणे महामार्ग विस्तारीकरणाला काही ठिकाणी अडचणी येत आहेत. विशेष करून येथे वृक्षतोडीला विरोध आहे. वृक्षतोड कोणालाच नको आहे, मात्र विकास कामांमध्ये अडचण येत असेल तर ते हटविलेही पाहिजेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार एकास पाच झाडे लावून आत्तापर्यंत महामार्गातील अडसर दूर होणे गरजेचे होते. ते झाले नाही, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! पत्रातून मिळाला सावध राहण्याचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()