Minister Dada Bhuse NMC Meeting : योजना जुन्याच, मात्र नव्या स्वरूपात

Dada Bhuse NMC Meeting
Dada Bhuse NMC Meetingesakal
Updated on

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी करण्याचा भाग म्हणून तातडीने विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. ३०) देताना महापालिकेचा शासनाकडे प्रलंबित असलेला आकृतिबंध, क्लस्टर विकास योजना, नमामी गोदा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर उद्योग वाढीसाठी एमआयडीसीमधील जागा देण्याचे आश्वासन देताना कृषिपूरक उद्योग नाशिकमध्ये आणण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

शिंदे सरकारमध्ये पालकमंत्री पदाचे वाटप झाल्यानंतर दादा भुसे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी आली. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार हेमंत गोडसे त्यांच्यासोबत होते. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पालकमंत्री भुसे यांचे स्वागत केले.(Minister Dada Bhuse NMC Meeting Nashik Latest Marathi News)

कोरोनाकाळात निधन झालेल्या नागरिकांना अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागली. तसेच, अमरधाममध्ये पुरेसे विधीचे बेड नसल्याने मृतदेहांची विल्हेवाट लावणे अडचणीचे ठरले. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून ५० बेडचे अद्ययावत अमरधाम बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

ही एकमेव योजना पालकमंत्र्यांनी नव्याने दिली. दरम्यान, स्मार्टसिटीअंतर्गत गावठाणात सुरू असलेल्या कामांच्या अनुषंगाने नागरिकांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात चर्चा झाली.

आरसीसी बांधकाम अशक्य

शहरातून वाहणाऱ्या गोदावरी व उपनद्यांच्या तीरावर आरसीसी प्रकारची किंवा गॅबियन पद्धतीची भिंत उभारून सुशोभीकरण केले जाणार आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरसीसी बांधकाम करता येत नाही. सुशोभीकरण करायचे ठरल्यास नमामि गोदा प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यातदेखील या प्रकल्पाचा समावेश असताना नव्याने खर्च करणार का, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे.

जुन्या योजना गळी उतरण्याचा प्रयत्न

पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक शहरा संदर्भात नवीन घोषणा करताना यापूर्वी घोषणा झालेल्याच जुन्या योजना नव्या स्वरूपात नाशिककरांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये शासनाला मनपाच्या नवीन आकृतिबंध सादर केला आहे. १४००० जागांचा आकृतिबंध मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून ते सत्तेत असतानादेखील त्यावर निर्णय का झाला नाही.

विशेष म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री असताना त्यांनीदेखील या विषयाकडे ढुंकून बघितले नाही. मात्र, आता पालकमंत्री भुसे यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. २०११ पासून एकलहरे रोडवरील किर्लोस्कर कंपनीला शासनाने ८७ एकर जागा दिली आहे. त्या जागेचा वापर होत नसल्याने ती परत ताब्यात घेऊन चित्रनगरी उभारण्याचे प्रयत्न सुरू आहे. पालकमंत्री भुसे यांनी पुन्हा चित्रनगरीच्या विषयाला हवा दिली.

Dada Bhuse NMC Meeting
शहरी भागात Smart Meter बसवावेत : Deputy CM देवेंद्र फडणवीस

चार एफएसआयचा फुगा

जुने नाशिक व पंचवटी भागात अनेक जुने वाडे आहे. या वाड्यांचा क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत चार एफएसआय देऊन सामूहिक विकास केले जाणार आहे. मात्र, राज्यात एकत्रित विकास नियंत्रण नियमावली भाजप सरकारच्या काळात मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यात बदल शक्य नाही. शहर विकास आराखड्यामध्ये यापूर्वीच्या एफएसआयमध्येदेखील कपात करून दीड करण्यात आल्याने पालकमंत्र्यांनी थेट ४ एफएसआयचे दिलेले आश्वासन धूळफेक न ठरो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहराच्या या प्रश्नांना प्राधान्य

- सिडकोतील २८ हजार सदनिका फ्री होल्ड करणे.

- शहरातील झोपडपट्ट्यांसाठी एसआरए स्कीम राबवणे.

- नाशिक रोड विभागासाठी अडीचशे कोटी खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना.

- २०१८ मध्ये वाढविण्यात आलेल्या घरपट्टी कराच्या दरात सुधारणा करणे.

- पूररेषा बाबत नवीन सर्वेक्षण करून पूररेषा दहा ते पन्नास मीटरच्या आत निश्चित करणे.

- ओढा येथील शासनाच्या ८७ एकर जागेवर चित्रनगरी उभारणे.

Dada Bhuse NMC Meeting
Uddhav Thackeray यांना चांगले आरोग्य लाभो : खनिकर्म मंत्री दादा भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()