Shresthadan Mahaabhiyan | आता 65 वर्षावरील व्यक्तीही करणार अवयवदान : मंत्री डॉ. भारती पवार

Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.
Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.esakal
Updated on

नाशिक : अवयवदानाविषयी समाजात जनजागृती व्हावी म्हणून केंद्र सरकारने अवयवदानाच्या नियमांमध्ये मोठे बदल करत ६५ वर्षावरील व्यक्तींना आता अवयवदानाची परवानगी दिली आहे.

'वन नेशन, वन डोनेट' अंतर्गत दुसऱ्या राज्यासाठी आवश्यक असलेली डोमेसाईलची अट काढून टाकल्यामुळे देशातील कुठल्याही राज्यात व्यक्तीला अवयव उपलब्ध होतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (Minister Dr Bharti Pawar statement on Shresthadan Mahaabhiyan organ donation campaign nashik news)

दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन व मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या यांच्यातर्फे कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात दोन दिवस आयोजित 'श्रेष्ठदान महाअभियान' या कार्यक्रमाच्या समारोप रविवारी (ता.१९) झाला, त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, फेडरेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, महाअभियानाचे संयोजक सुनील देशपांडे, मृत्यूंजय फाऊंडेशनचे संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे उपस्थित होते. प्रसंगी मंत्री डॉ. पवार म्हणाल्या, देशात अवयव व देहदानात तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तमिळनाडू यासाठी संदर्भात करत असलेले प्रयत्न आपणही महाराष्ट्रात सुरु करू. त्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाच्या माध्यमातून आवश्यक असलेली संपूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.
Shiv Jayanti 2023 : पंचवटीत महिलांच्या हस्ते शिवरायांची महाआरती

देशातील २२० कोटी जनतेने कोरोना लस घेतली. जगातील कुठल्याही देशात इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वीरीत्या लसीकरण झालेले नाही. 'जिथे जिथे रक्तदान, जाते जाते अंगदान' अशा शब्दात ही चळवळ यशस्वीपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांना त्यांनी प्रेरणा दिली. डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अशोक सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.

एकत्रित माहितीसाठी प्रयत्न : गमे

अवयवदानाविषयी जनजागृती करत असताना कुठल्या शहरात किती अवयव व देहदान झाले आहेत, याची एकत्रित माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका व आरोग्य विभागाने एक पोर्टल विकसित करण्याचा विचार आहे.

जेणेकरून देणारा किंवा घेणारा यांना हे अवयव मिळण्यात सुलभता कशी येईल यादृष्टीने प्रशासन म्हणून आम्ही काम करू, असे आश्वासन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयांमध्ये अवयव, देहदानाविषयी जनजागृती व्हायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.
Ultraman Triathlon : रोहित पवार झाला भारताचा वेगवान अल्ट्रामॅन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.