Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन पीडितेवर वारंवार अत्याचार केल्यानंतर पसार झालेल्या संशयिताला भद्रकाली पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे.
असगर अली इसराफील अन्सारी (१९, रा. जाडोपूर, दुखहरण, ता.जि. गोपाल गंज, बिहार) असे संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन पीडितेच्या फिर्यादीनुसार, पीडितेशी संशयिताने ओळख करून प्रेम असल्याचे सांगत लग्न करण्याचे आमिष दाखविले. (Minor girl sexual assult suspect arrested from Bihar nashik crime news)
तसेच वेळोवेळी घड्याळ, पायातील पट्ट्या, अंगठी अशा भेटवस्तू दिल्या. यादरम्यान त्याने पीडितेला संदर्भ हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील बांधकाम सुरू असलेल्या खोलीत नेऊन गेल्या एप्रिल महिन्यापासून १५ मेपर्यंत वारंवार शारीरिक संबंध केले.
तसेच, १५ मे रोजी, मी तुला घेण्यासाठी नाशिकरोडला येतो, आपण लग्न करून तू तुझे सामान घेऊन ये, असे खोटे सांगून संशयित अन्सारी त्याच्या बिहारमधील मूळगावी निघून गेला. पीडितेने त्याच्याशी संपर्क साधला असता, संशयिताने, मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे सांगत फोन कट करीत होता. याप्रकरणी फसवणूक झाल्याने पीडितेने भद्रकाली पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
थेट बिहारमधून अटक
दरम्यान, भद्रकाली पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित बिहारमधील त्याच्या मूळ गावी असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी पथकासह गोपालगंज जिल्ह्यातील जाडोपूर गाठले आणि संशयित अन्सारीच्या मुसक्या आवळल्या.
त्यास न्यायालयात हजर केले असता, त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कामगिरी भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे, किरण जाधव, विशाल गायकवाड यांनी बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.