Nashik News : ‘ग्‍लॅमर’ व पैसा येईल, तेव्‍हाच खेळांचा विकास होईल : मिर रंजन नेगी

भारतात हॉकी, कबड्डीसह इतर क्रीडा प्रकारातील खेळाडूंना अपेक्षित सन्‍मान, प्रेम मिळत नाही.
Mir Ranjan Negi
Mir Ranjan Negiesakal
Updated on

Nashik News : भारतात हॉकी, कबड्डीसह इतर क्रीडा प्रकारातील खेळाडूंना अपेक्षित सन्‍मान, प्रेम मिळत नाही. दोन-तीन वेळा ऑलिम्‍पिक स्‍पर्धा खेळलेले खेळाडू जनमानसात वावरल्‍यास त्‍यांना नागरिक ओळखू शकत नाहीत.

क्रिकेट खेळात ज्‍याप्रमाणेच इतरही खेळांमध्ये जेव्‍हा ‘ग्‍लॅमर’ व पैसा येईल, तेव्‍हाच त्‍या खेळांचा विकास होऊ शकेल, असे मत ‘चक दे इंडिया’फेम व आशियायी हॉकी सुवर्णपदक विजेते, प्रशिक्षक मिर रंजन नेगी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्‍यक्‍त केले. (Mir Ranjan Negi statement of Glamour and money will come only then will sports develop nashik news )

भारतीय हॉकी संघाच्‍या प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिल्‍यास आपण देशाला हमखास पदक जिंकून देऊ, असा दावा त्‍यांनी केला. शहरात होत असलेल्‍या नाशिक ‘मविप्र’ मॅरेथॉनसाठी प्रमुख अतिथी असलेले मिर रंजन नेगी यांनी ‘सकाळ’बरोबर संवाद साधला. तत्‍पूर्वी, त्‍यांनी शनिवारी (ता. २७) त्र्यंबकेश्‍वर येथे दर्शन घेतले. तसेच, निफाड येथील मैदानावर गोल्‍फ खेळण्याचा आनंद घेतला.

मिर रंजन नेगी म्‍हणाले, की ज्‍याप्रमाणे कबड्डीला गेल्‍या काही वर्षांत लोकप्रियता मिळते आहे, त्या धर्तीवर इतरही खेळ लोकप्रिय होऊ शकतात. त्‍यासाठी जास्‍तीत जास्‍त प्रायोजकांचे पाठबळ, तसेच खेळाला ग्लॅमर बनविणे आवश्‍यक आहे.

भारतात जन्‍मजात खेळाडू तयार होत असतात. त्‍यामुळे खेळाडू घडविण्याचा विषय येत नाही. केवळ क्रीडा कौशल्‍ये असलेल्‍या उदयोन्मुख खेळाडूंना योग्‍य प्रशिक्षण देत दिशा दाखविण्याची आवश्‍यकता असते.

Mir Ranjan Negi
Nashik News : मेरी कॉलनीला झाडाझुडपांचा विळखा!

आजही मन सुन्न होते...

पाकिस्‍तानविरुद्ध सामन्‍यातील पराभव व त्‍यानंतर झालेले आरोप याविषयी नेगी म्‍हणाले, की संघातील सर्व खेळाडूंना सत्‍य माहीत होते म्‍हणून कुणीही माझ्याविषयी कधी वाईट बोलले नाही. परंतु, त्‍या कठीण प्रसंगात कुणी माझ्या पाठीशीही उभे राहिले नाही. कुटुंबीय, मित्रांच्‍या पाठबळामुळे कठीण प्रसंगातून बाहेर येऊ शकलो. आजही तो दिवस आठवल्‍यावर मन सुन्न होते, अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

परदेशातील प्रशिक्षक निरुपयोगी

संघात विविध प्रांतांतून खेळाडू येत असून, प्रत्‍येकाची वेगळी शैली असते. भारतीय प्रशिक्षक हा खेळाडूंची मानसिकता ओळखून त्‍यादृष्टीने मार्गदर्शन करतो. याउलट परदेशातील प्रशिक्षक साचेबद्ध पद्धतीने काम करतात. त्‍यामुळे परदेशातील प्रशिक्षक आपल्‍या दृष्टिकोनातून निरुपयोगी आहेत.

असे असतानाही फेडरेशन परदेशातील प्रशिक्षकांना दहा-बारा लाखांचे वेतन देते. भारतीय प्रशिक्षकांनी अल्प मानधनात किंवा मोफत काम करावे, अशी अपेक्षा बाळगत असल्‍याची खंत नेगी यांनी व्‍यक्‍त केली.

Mir Ranjan Negi
Nashik News : गोदाघाटाचे सौंदर्य, पावित्र्य जपणे नाशिककरांचे कर्तव्य : पालकमंत्री दादा भुसे

भारतीय संघाने मानसिकदृष्ट्या कणखर व्‍हावे

केपटाऊन येथे सुरू असलेल्‍या स्‍पर्धेत भारतीय संघ निश्‍चितच पदक जिंकेल, असा विश्‍वास श्री. नेगी यांनी व्‍यक्‍त केला. ते म्‍हणाले, की आगामी ऑलिम्‍पिक स्‍पर्धेत भारतीय संघ पदकाचा दावेदार असेल. संघ मजबूत असला, तरी मानसिकदृष्ट्या कणखर होण्याची आवश्‍यकता आहे. गेल्‍या दोन दशकांत श्रीजेश हा उत्‍कृष्ट यष्टिरक्षक म्‍हणून नावारूपाला आलेला आहे. त्‍याच्‍यासारखे खेळाडू खेळाचे उज्ज्वल भविष्य आहेत.

‘चक दे इंडिया’नंतर बदलले आयुष्य

नेगी म्‍हणाले, की ‘चक दे इंडिया’ चित्रपट प्रसिद्ध झाल्‍यावर कामगिरीविषयीची माहिती सर्वसामान्‍यांपर्यंत पोहोचली. हा चित्रपट व त्‍यानंतर केलेल्‍या रियॅलिटी शोज्‌मधील सहभागानंतर आयुष्यात आमूलाग्र बदल झाले. सर्वसामान्‍यांमध्ये लोकप्रिय झाल्‍यावर जबाबदारीची जाणीवही झाली. कामगिरी उंचावत राहण्यासाठी प्रोत्‍साहन मिळाले.

Mir Ranjan Negi
Nashik News : आर्थिकदृष्ट्या भारताला सक्षम करण्यात सहकाराचा वाटा : केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा

मिर रंजन नेगी म्‍हणाले...

- हॉकी फेडरेशनचे नेतृत्व हॉकीपटूने करण्याची आवश्‍यकता

- प्रायोजक पाठबळासाठी तयारी, पारदर्शकता आणण्याची गरज

- हॉकी इंडिया लीग पुन्‍हा सुरू करण्याची आवश्‍यकता

- ओडिशात नवीन पटनायक यांनी हॉकीला दिले पुनरु‍ज्जीवन

- अडीचशे कोटींचा निधी देत खेळाडूंना पुरविल्‍या सुविधा

- केंद्र सरकारनेही या धर्तीवर हॉकीचा विकास साधावा

Mir Ranjan Negi
Nashik News : सहकारी संस्थांच्या बळकटीसाठी केंद्राने 100 कोटी द्यावेत; दिलीप वळसे-पाटील यांची स्तुतिसुमने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.