नाशिक : महापालिका पंचवटी विभागीय कार्यालयात लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महापालिकेकडे विविध कामांसाठी परवानगी मागत असताना संबंधित व्यक्तींकडून फी जमा करण्यात आली. महापालिकेच्या दप्तरात नोंद करताना बनावट पावत्यादेखील जोडण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात रक्कम तिजोरीत जमा झालेली नाही. अपहार झालेली रक्कम जवळपास पन्नास लाखांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. प्राथमिक टप्प्यात अपहार झाल्याच्या प्रचाराला लेखा परीक्षण विभागाकडून दुजोरा देण्यात आला आहे. (Misappropriation of funds in Panchvati Divisional Office Scrutiny by Audit Department on Suspicion Nashik Fraud News)
कामाच्या सुसूत्रीकरणासाठी महापालिकेने नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नाशिक रोड, सातपूर, सिडको असे सहा विभाग तयार केले आहे. प्रत्येक विभागांच्या वतीने दैनंदिन सुविधा पुरविण्याबरोबरच कर वसुली देखील केले जाते. विविध प्रकारचे कर, परवाने, रस्ता तोडफोड फी आदी प्रकारचे तर विभागीय कार्यालयांच्या मार्फत अदा केले जातात. घर व पाणीपट्टी स्वतंत्ररीत्या जमा केली जाते.
नगररचना विभागाचे विकास शुल्कदेखील या विभागातच थेट अदा केला जातो. विभागीय कार्यालयात जमा होत असलेल्या करांच्या पावत्या संबंधितांना दिल्या जातात. त्याची नोंद नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून केली जाते. त्या संदर्भातील संगणकीय पासवर्ड फक्त विभागीय अधिकाऱ्यांकडेच आहे. संबंधित व्यक्तीला पावती दिल्यानंतर संगणकामध्ये नोंद करणे आवश्यक असते. पंचवटी विभागात रस्ता तोडफोड फीसह नळजोडणी देण्यासंदर्भात जमा झालेल्या रकमेच्या बनावट पावत्या दिसत असल्या तरी रक्कम मात्र जमा झाली नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!
सदरची रक्कम 50 लाखांच्या आसपास असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पंचवटी विभागीय कार्यालयात रेखा परीक्षण सुरू असताना सदर बाब समोर येत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात लेखापरीक्षण विभागातील सूत्रांनीदेखील दुजोरा दिला आहे. रकमेबाबत स्पष्टता नसली तरी पन्नास लाखांच्या आसपास अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रकरणाची व्याप्ती मोठी
यासंदर्भात लेखापरीक्षण विभागाकडून बारकाईने अभ्यास केला जात आहे. फरकाची रक्कम किती आहे, याबाबत अद्याप निश्चिती नसून संपूर्ण लेखापरीक्षण झाल्यानंतर प्रकरणाची स्पष्टता व व्याप्ती समोर येणार असल्याची सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी देखील नाशिक रोड विभागीय कार्यालयात घरपट्टी वसुली करताना अपहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. जवळपास वीस लाख रुपयांचा फरक दिसून आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. एका व्यवहारात असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांकडूनदेखील अपहार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र त्या महिला कर्मचाऱ्याकडून वसुली होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.