Nashik News : वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार! पंधरा दिवसांपासून रोहित्र नादुरुस्त

A farmer showing the damaged Rohitra in Morane Shiwar
A farmer showing the damaged Rohitra in Morane Shiwaresakal
Updated on

Nashik News : येथील मोराणे शिवारातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत त्रस्त झाले असून येथे पंधरा दिवसांपासून रोहित्र नादुरुस्त आहे. यामुळे पिकांसह जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वीज वितरण कंपनीने लक्ष घालून नादुरुस्त झालेला रोहित्र दुरुस्त करावा व शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (Mismanagement of electricity distribution company Rohitra been unwell for fifteen days Nashik News)

मोराणे शिवारातील रोहित्र क्रमांक सात वरील शेतकरी वारंवार होत असलेल्या नादुरुस्तीमुळे त्रस्त झाले आहेत. यामुळे रोहित्रावरील ग्राहक, शेतकरी वीज महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त करत आहे. (Latest Marathi News)

या रोहित्रावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी गेल्या २ वर्षांपासून पाठपुरावा करीत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून दाद मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

A farmer showing the damaged Rohitra in Morane Shiwar
Nashik News : पोर्टलवर मृत दाखवून अनुदान गोठविले; तक्रारीनंतर घटना उघडकीस

दरम्यान याबाबत अतिरिक्त रोहित्र मिळण्यासाठी स्थानिक आमदारांचे पत्र दिले असतानाही संबधित विभागाकडून पत्राला केराची टोपली दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. स्थानिक विभागात तक्रार करूनही महावितरणचे कर्मचारी तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहे.

मोराणे, अंबासन, चटाणेपाडा, ढोबले शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने पाळीव जनावरांवर रात्रीतून हल्ले वाढत आहेत. त्यात वीज पुरवठा खंडित असल्याने रात्री शेतात जाण्यास शेतकरी धजावत नाहीत.

वीज वितरण कंपनीने नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करावा तसेच अतिरिक्त रोहित्र बसवून वीजेचा अतिरिक्त भार संतुलित करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

A farmer showing the damaged Rohitra in Morane Shiwar
Water Crisis : मनमाडवर पाणी टंचाईचे सावट; वाघदर्डी धरणात जेमतेम पाणीसाठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()