Nashik News : जिल्हा टॅंकर मुक्तीसाठी आता 'मिशन भगीरथी प्रयास'

Nashik News
Nashik News esakal
Updated on

नाशिक : दरवर्षींचा दुष्काळ, पिण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करणे हे जिल्ह्यातील दुष्काळी गावातील चित्र पाटलण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा टॅंकरमुक्त करण्याचा संकल्प करत, ‘मिशन भगीरथी प्रयास’ हाती घेतले आहे. या

मिशन अंतर्गत जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमधील कायम पाणी टंचाई असलेल्या दुष्काळी गावांमध्ये २० ते २५ सिमेंट बंधारे बांधली जाणार आहेत.

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून हे बंधारे बांधून, यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे सर्व पाणी गावात अडविले जाणार आहे. याबाबतचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे.

त्यासाठी अतिरिक्त मुख्य़कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी सर्व तालुका उपअभियंता यांची बैठक घेत, त्यांच्याकडून हा सुक्ष्म आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहे.

Nashik News
Nashik News : 150 कोटीचे देयके अदा करण्यासाठी काम सुरू; विकासकामांना कात्री?

यातच, सुरगाणा तालुक्यातील गुजरात समीवर्ती भागातील ५५ हून अधिक गावांना मूलभूत सुविधा यात प्रामुख्याने पाणी मिळत नसल्याने गुजरातला जोडण्याची मागणी केली असता,

सुरगाणा तालुका सर्वांगीण विकासासाठी अॅक्शन प्लॅन बनविताना ठराविक गावांना पाणी नसल्याने टॅंकरनेच पाणी पुरवठा करावा लागत असल्याचे जिल्हा परिषदेच्या निर्दशनास आले. सुरगाणा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होऊनही, धरणे असूनही काही गावांची तहान टॅंकरद्वारे भागवावी लागते.

Nashik News
Nashik News : सुदाम भागुजी सांगळे वकील यांचे निधन; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

फेब्रुवारी महिना संपत नाही तोच, ग्रामीण भागातून टॅंकरची मागणी सुरू होते. मे महिना असो की, पाऊस लांबली की गावे आणि वाड्यांवस्त्यांतील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते.

जिल्हा परिषदेच्या मख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी यंदा टँकर मुक्तीचा संकल्प केला असून त्यासाठी भगीरथी प्रयास मिशन राबविली जाणार आहे.

Nashik News
Nashik News : नाशिकमध्ये अनधिकृत शाळांची शोधमोहीम; शिक्षण विभागाकडून कारवाई

असे असेल मिशन

- जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये मिशनची अंमलबजावणी

- प्रत्येक तालुक्यातील साधारण १५ ते २० गावांची निवड.

- निवड केलेल्या गावात सिमेंट बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस प्रथम प्राधान्य

- दुष्काळी गावात आवश्यकतेनुसार नव्याने सिमेंट बंधारे

- बंधाऱ्यांची सर्व कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून

- पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील गावामध्ये तलाव, दगडी बांध, पाणंद रस्ते, वैयक्तीक लाभातून बंधारे

Nashik News
Nashik Crime News : चक्क किराणा दुकानात दारूची विक्री; पोलिसांच्या हाती लागले मोठे घबाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.