Nashik News : जातेगावात सीसीटीव्हीच्या नावाने निधीचा दुरुपयोगच; आधीचेच नादुरूस्त त्याचे काय?

जातेगाव (ता. नांदगाव) येथे ग्रामपालिकेने पंधराव्या वित्त आयोगातून कार्यालय आवार आणि गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले खरे, परंतु त्यांचा काही महिन्यातच बोजवारा उडाला आहे.
CCTV installed here and wire broken.
CCTV installed here and wire broken.esakal
Updated on

अरुण हिंगमिरे ः सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जातेगाव (ता. नांदगाव) येथे ग्रामपालिकेने पंधराव्या वित्त आयोगातून कार्यालय आवार आणि गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले खरे, परंतु त्यांचा काही महिन्यातच बोजवारा उडाला आहे.

आधीचेच नादुरूस्त असून त्यांची दुरुस्ती न करता नवीन सीसीटीव्ही बसविण्याचा घाट घातला जात आहे. शासनाच्या निधीचा सदुपयोग करा, विनाकारण खर्च नको अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. (Misuse of funds in name of CCTV in Jategaon nashik news)

येथील ग्रामपालिका कार्यालयाच्या आत एक, कार्यालयामागे एक, समोर एक, महादेव मंदिरासमोर एक, प्राथमिक शाळेच्या आवारात एक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक, बसस्थानक परिसरात दोन आणि वाकला रस्ता चौफुली येथे दोन असे गावात एकूण दहा सिसीटिव्ही कॅमेरे बसविले होते. त्यास पंधरा वित्त आयोगातून सुमारे ८८ हजार रुपये खर्च झाले.

परंतु त्यापैकी चार ते पाच कॅमेरे थोड्याच दिवसात आपोआप बंद झाले. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा सुरू झाले. गावात आलेल्या एका अवजड वाहनाच्या मागील बाजूच्या हुडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बसस्थानक परिसरातील दोन आणि वाकला रोड चौफुली श्री. पिनाकेश्वर देवस्थान स्वागत कमानीवर लावलेल्या दोन कॅमेऱ्यांना गेलेली वायर अडकून तुटल्याने महत्त्वाचे असलेले चार कॅमेरे बंद पडले आहे.

CCTV installed here and wire broken.
Nashik News : नाशिकमध्ये विविध ठिकाणी गुंडाविरोधी पथकाकडून कोम्बिंग ऑपरेशन!

विशेष म्हणजे वरील कॅमेऱ्याने केलेली चित्रीकरण पाहण्यासाठी कार्यालयामध्ये संगणक प्रणालीच्या एलईडी टीव्हीवर जोडलेले होते. नागरिकांनी ओरड केल्यानंतर ग्रामपालिका प्रशासनाने पुन्हा काही निधी खर्च करून एक एलईडी टीव्ही विकत घेतला असून, आणखी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना पदाधिकारी आखत असल्याचे समजते.

आधीच बसविलेल्या दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी जवळपास लाखभर रुपये खर्च झालेले आहेत. गावाचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने वरील योजनेत खर्च केलेली रक्कमही जवळपास काही महिन्यात वाया गेल्याचे दिसून आले असताना पुन्हा खर्चाचा घाट का घातला जात आहे याबाबत गावात चर्चा सुरू आहे.

CCTV installed here and wire broken.
Nashik News : फिरत्या नारळी सप्ताहाचा मान यंदा सिन्नरकरांना; 'तयारीला लागा' चे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.