Nashik : सिपेट जागेवरून आमदार भुजबळ-खासदार गोडसे आमने सामने

hemant godse clash against bhujbal
hemant godse clash against bhujbalesakal
Updated on

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात राजकारण सुरू असताना, आता केंद्र शासनाच्या प्रस्तावित सिपेट प्रकल्पावरून (CIpet Project) आमदार छगन भुजबळ आणि खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्यात राजकारण पेटले आहे. श्री. भुजबळ विकासकामांत खोडा घालत असल्याचा आरोप केल्यानंतर रविवारी (ता. ३) भुजबळ समर्थकांनी ११ हजार झाड असलेल्या जागेसाठी खासदारांचा अट्टाहास का, असा प्रश्न करीत खासदार हेमंत गोडसे यांच्यावर पलटवार केला. (MLA chhagan Bhujbal MP hemant Godse clash over Cipet project Nashik News)

केंद्र शासनाने आभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सेंटर इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल व्हेकेशनल ट्रेनिंग सेंटर) सिपेट प्रकल्पासाठी पनवेलची निवड केली होती. मात्र, पनवेल येथे तीन वर्षांनंतरही प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होऊ न शकल्याने हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची शक्यता होती. त्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत सिपेटच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेत प्रकल्पाला नाशिकला जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व पनवेलचा सिपेट प्रकल्प नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यासाठी गोवर्धन (ता. नाशिक) येथील सर्व्हे ३३ मधील १२.३३ हेक्टर जागा व्होकेशनल ट्रेनिंग (सेंटर फॉर स्किलिंग ॲन्ड टेक्निकल सर्पोट) सेंटरसाठी सुचविली होती. मात्र, या अनुषंगाने माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे पत्र पुढे आल्यावरून राजकारण पेटले आहे.

याच जागेचा अट्टहास का?

दरम्यान, या वादात ११ हजार वृक्ष तुटणार असल्याने माजी मंत्री भुजबळ यांनी विरोध केला आहे, तर वन विभागाच्या अहवालात वेगळेच वास्तव पुढे आले आहे. त्यात प्रस्तावित जागेवरील सगळे झाडेझुडपे विदेशी असून, पर्यावरणी अंगाने या प्रजाती मौल्यवान नसल्याचे शासनाचेच आदेश आहेत. त्यामुळे खासदारांचा त्या जागेसाठी अट्टाहास का, असा प्रश्न करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी खासदार गोडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

भुजबळांचे पर्यावरणाकडे बोट

माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना १८ एप्रिल २०२२ ला दिलेले पत्र पुढे आले आहे. त्यात सिपेट प्रकल्पांसाठी सुचविलेल्या सर्व्हे क्रमांक ३३ मधील १२.३३ हेक्टर जागेवर ११ हजार वृक्ष असल्याने ही जागा सिपेटला देण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. तसेच स्थानीक ग्रामसभेनेही सिपेटला जागा देण्याची परवानगी नाकारली आहे. सिपेटचे केंद्र नाशिकला होणे आवश्यक असले, तरी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सिपेट संस्थेला नाशिकमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे सुचविले आहे.

वन विभागाचा अहवाल

वन विभागाने यासंदर्भात अहवाल दिला आहे. त्यात गोवर्धन शिवारातील गट क्रमांक ३३ मधील १२.३३ आर जागेवर ग्लिसिरिडिया प्रजातीची झाडेझुडपे असून, त्यात फक्त १ निलगिरीचे, १० बाभूळाचे वृक्ष आहेत. या क्षेत्रात देशी प्रजातीची कोणतेही झाडे नसून ही झाडेझुडपे विदेशी प्रजातीची आहे. मौल्यवान प्रजातीत ग्लिरीसिडिया प्रजातीचा उल्लेख होत नाही, तसेच काशीद ग्लिरीसिडाय, पळस, विलायती चिंच, पार्किंनसोनिया, पेल्टाफोरम, स्पाथोडिया, गुलमोहर, जकरांडा प्रजातीची लागवड करू नये, असे ६ डिसेंबर २०१४ चा शासनाचा आदेश असल्याचा अहवाल वन विभागाने दिला आहे. रोप वाटिकेतूनही शासनाने ग्लिरीसिडीयासारख्या विदेशी प्रजातीचे रोपटे हद्दपार केले आहे.

hemant godse clash against bhujbal
नाशिक : ट्रॅक्टरखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यु

"सिपेट संस्थेला छगन भुजबळ यांचा कधीही विरोध नव्हता आणि नाही. भुजबळांचे नाव घेऊन सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. तरुणांचा शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार मिळण्यासाठी सिपेटचे केंद्र नाशिकमध्येच उभे राहावे. मात्र, त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करावी, यासाठी छगन भुजबळ यांचा आग्रह आहे."

-कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

hemant godse clash against bhujbal
Nashik : अनैतिक संबंधातून एकाच्या गळ्यावर सुऱ्याने वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.