Nashik News : राज्यातील अनुदानित तसेच टप्पा अनुदानित शिक्षकांचे प्रश्न सातत्याने मागणी करूनही सुटत नाहीत.
यामुळे शिक्षक बांधव मेटाकुटीला आले असून, शिक्षकांच्या या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, या मागणीसाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे सहकाऱ्यांबरोबर पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयापुढे १७ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. (MLA Darade on hunger strike from 17 due to pending problems of teachers Nashik News)
डिसेंबर २०२२ मध्ये एक हजार १६० कोटी रुपये विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांसाठी तरतूद करून दिलेली आहे. शासन आदेश ६ फेब्रुवारी २०२३ ला काढला आहे.
परंतु, नव्याने अनुदानावर आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकमधील शिक्षक, शिक्षकेतर बांधवांना शालार्थ आयडी अद्याप मिळाला नसल्याने त्यांचा हेलपाटे घालून जीव मेटाकुटीला आला आहे.
अनुदान मंजूर होऊनही संबंधित शाळा व शिक्षकांना शालार्थ आयडी मिळण्यासाठी उपसंचालक कार्यालयाकडे व बोर्डाकडे हेलपाटे मारून जीव मेटाकुटीला आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत काळे या शिक्षकेतर कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी आंदोलन केले जात आहे.
शासनाने घोषणा केल्याप्रमाणे सर्व नवनियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व स्तरांवरील शालार्थ आयडी प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, शिक्षकांची अनेक वर्षांपासून रखडलेली फरक बिले द्यावीत,
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कनिष्ठ महाविद्यालयांची वाढीव पदांची माहिती शासनाला तत्काळ पाठवावी, नाशिक विभागातील जळगाव, अहमदनगर आणि नाशिक जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेत होण्याचा शासन निर्णय निर्गमित करावा,
नाशिक विभागातील २०, ४० व ६० टक्क्यांवर असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेला होण्यासाठी निधीची तरतूद व्हावी, मुख्याध्यापक व महिला शिक्षकांना बीएलओ कामातून वगळावे आदी मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे.
या प्रश्नांची ठोस सोडवणूक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आमदार दराडे यांनी दिला. राज्यातील शिक्षक बांधवांनीही आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
"शिक्षण विभाग व शिक्षणमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही काही प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. अधिकाऱ्यांकडेही सातत्याने मागणी करूनही समस्यांची दखल होत नसल्याने माजी आमदार दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे यांच्यासह आयुक्तांच्या कार्यालयासमोर प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत उपोषण करणार आहे."- किशोर दराडे, आमदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.