Nashik News: जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था भ्रष्ट : आमदार दराडे

MLA Darade statement Education system in the district is corrupt nashik news
MLA Darade statement Education system in the district is corrupt nashik news
Updated on

Nashik News : जिल्ह्याची शिक्षण व्यवस्था अतिशय भ्रष्ट झाली आहे. या मॅडम लाच घेताना, त्या मॅडम लाच घेताना आढळल्या, हा अधिकारी लाच घेतल्याने निलंबित झाला अशा घटना घडत आहेत. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना मोबदला द्यावा लागतो, हे लपून राहिलेले नाही.

अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई झाली पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केले. (MLA Darade statement Education system in the district is corrupt nashik news)

सारडा सर्कल येथील नॅशनल ऊर्दू हायस्कूल सभागृहात महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघ संलग्न नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर महासंघाचा जिल्हा मेळावा तथा सहविचार सभा शनिवारी (ता. २५) झाली. या वेळी ते बोलत होते. महासंघाचे राज्याध्यक्ष वाल्मीक सुरासे अध्यक्षस्थानी होते.

दराडे म्हणाले, की जिल्ह्यात शिक्षणाचे घाणेरडे काम सुरू आहे. अशी प्रथा बंद करणे आवश्यक झाले. लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कामासाठी दर ठरलेले आहेत. त्या पद्धतीने आकारणी झाली तरच कामे होत असतात. कर्मचाऱ्यांनी असे प्रकार थांबविणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांना अजिबात घाबरू नये.

अडचण येत असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. तुमचे काम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे कंत्राटी भरती चुकीची आहे. सरळ सेवेने शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मुद्दा अधिवेशनात मांडणार आहे. १०, २०, ३० आश्वासित प्रगती योजना वेतनश्रेणी मंजुरीच्या प्रगतिपथावर आहे. तत्पूर्वी, अधिवेशनात १२, २४ आश्वासित प्रगती योजना वेतनश्रेणी प्रथम मंजुरी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MLA Darade statement Education system in the district is corrupt nashik news
YCMOU Bharti News: नातेवाइकांना नोकरी देतात, मग आम्‍हालापण द्या..! मुक्‍त विद्यापीठातील भरती वादात

याशिवाय, त्यांच्या विविध मागण्यांसह जुनी पेन्शन योजना या संदर्भातही पाठपुरावा केला जाईल. माझ्या स्वखर्चातून न्यायालयीन लढाई लढली जाईल. पेन्शन नसल्यास कुटुंबीयही विचारणार नाही. त्यामुळे पेन्शन महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. निवडणुका आल्या आहेत. त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगत वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे.

त्यासाठी मात्र तुमची आवश्यकता लागेल, असेही त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हटले. तसेच, कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांचाही प्रश्न गंभीर आहे. त्यातूनही त्यांची मुक्तता करण्यासंदर्भात अधिवेशनात प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मेळाव्याची सुरवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. या वेळी महासंघाचे महासचिव पाराजी मोरे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ धात्रक, सचिव लियाकत पठाण, कार्याध्यक्ष संदीप औटे, उपाध्यक्ष जयश्री जोगदंड, भाऊसाहेब बोराडे, सचिन मुंढे, राजेंद्र चव्हाण, प्राचार्य तोसीब शेख, संजय सानप, जावेद शेख आदी उपस्थित होते.

आमदारांना दिले निवेदन

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन लागू करावी, यासह विविध मागण्यांचे लेखी निवेदन आमदार किशोर दराडे यांना देण्यात आले.

MLA Darade statement Education system in the district is corrupt nashik news
Nashik News: जिल्ह्यात ग्रामसचिवालयांसाठी आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये रस्सीखेच; 8 प्रस्ताव प्राप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.