Nashik : अन् आमदार फरांदे यांचे पैसे केले परत

MLA Devyani Pharande latest marathi news
MLA Devyani Pharande latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : आईच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मागून एका भामट्याने नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यासह चार महिला आमदारांना गंडा (Fraud) घातला. याबाबत आमदार फरांदे (MLA Devyani Farande) यांनी नाशिक सायबर पोलिसात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संशयिताला संपर्क साधल्यानंतर त्याने आ. फरांदे यांचे पैसे परत केले.

दरम्यान, अशा प्रकारामुळे खरोखरीच अडचणी असलेल्यांवर अन्याय होण्याची शक्यता अधिक असल्याचे आ. फरांदे यांनी बोलून दाखविले. (MLA devayani Farande money returned by police nashik Latest Marathi News)

गेल्या आठवड्यात आमदार देवयानी फरांदे यांना संशयित मुकेश राठोड याने मोबाईलवर संपर्क साधून, आपण पंचवटीतील असून आईला वैदयकीय उपचारासाठी पुण्यात दाखल केले आहे. तिच्या औषधोपचारासाठी साडेचार हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली. यावर, आ. फरांदे यांनी विचारपूस केल्यानंतर त्यांना संशयित राठोड यास खरोखरीच गरज असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ फोन पेवरून राठोड यास चार हजार रुपये पाठविले.

MLA Devyani Pharande latest marathi news
"रडण्याचे ढोंग करू नका..."; उद्धव ठाकरेंचा कदमांना टोला

दोन दिवसांनी आ. फरांदे या राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मुंबईत गेल्या असता, त्याठिकाणी आमदार माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर आणि श्‍वेता महाले यांच्याशी गप्पागोष्टी करताना त्यांनाही अशारितीने फोन आला आणि संशयिताला आर्थिक मदत केल्याचे सांगितले.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, आ. फरांदे यांनी त्यांच्या स्वीय सहायकाला नाशिकच्या सायबर पोलीसांकडे संपर्क साधण्यास सांगून घडलेली घटना सांगितली. त्यानुसार, सायबर पोलीसांनी संशयित मुकेश राठोड यास संपर्क साधून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगितले.

यामुळे संशयित राठोड याने काही क्षणात आ. फरांदे यांना चार हजार रुपये ऑनलाईन परत पाठविले. दरम्यान, आ. फरांदे यांनी याबाबत जागरुकता दाखविल्याने भामट्याची बनवेगिरी उघड झाली.

"प्रश्‍न चार हजार रुपयांचा नाही, तर एखादंवेळी खरोखरीच अडचणी असलेल्याने मदत मागितली तरी ती करताना अशा घटनेमुळे मनामध्ये शंका येईल. आणि मदत न केल्याने खरोखरीच गरज असलेल्यास मदत करता येणार नाही, याची शक्यता अधिक आहे."

- देवयानी फरांदे, आमदार.

MLA Devyani Pharande latest marathi news
मुळशी धरण परिसरातील धक्के भूकंपाचे नाहीत; टाटा पॉवरचं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.