इंदिरानगर (जि. नाशिक) : जी- २० संदर्भातील काही उपक्रम मुंबई आणि पुणे येथे होत आहेत. त्यात नाशिकलादेखील संधी मिळावी यासाठी सरकारकडे प्रयत्न करत असल्याचे मत आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केले. पाथर्डी फाटा येथील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर असोसिएशन (म्हासमा) तर्फे आयोजित सोलर समिट २०२३ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. (MLA Devyani Farande statement Govt to give opportunity to Nashik at Solar Summit 2023 nashik news)
‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, ‘आयमा’चे अध्यक्ष निखिल पांचाळ, येस बँकेचे उपाध्यक्ष दीपक शर्मा, उद्योजक प्रदीप पेशकर, अनिल जाधव, असोसिएशनचे राज्य अध्यक्ष रोहन उपासनी, राज्य सचिव अमित कुलकर्णी आदी व्यासपीठावर होते.
आमदार फरांदे म्हणाल्या, की सोलर कंपन्यांना असलेली सबसिडी वेळेत कशी मिळेल यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. इतर कंपन्यांनीदेखील सौर ऊर्जेचे आणि एकंदरीत ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेता सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे. येस बँकेतर्फे सोलर कंपनीपासून ग्राहकांपर्यंत कोणत्या योजना आहेत, या योजनांचा व्याजदर, अर्ज करण्याच्या पद्धती याबाबत माहिती देण्यात आली.
सोलर क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. म्हासमा व येस बँक, आयमा आणि म्हासमा दरम्यान सामंजस्य करार करण्यात आले. या वेळी विविध कंपन्यांनी कंपनीतर्फे केल्या जाणाऱ्या उत्पादनांची आणि त्यासंबंधी असलेल्या आवश्यक बाबींची माहिती दिली.
हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून
गॅरंटी आणि वॉरंटी या बाबत विशेष चर्चा करण्यात आली. सबसिडी मिळालेल्या पहिल्या ग्राहकाचा सत्कार करण्यात आला. सोलर उत्पादनांवर ग्राहकांना सबसिडी मिळते. ही सबसिडी कंपन्यांतर्फे ग्राहकांना दिली जाते .मात्र शासनाकडून ती वेळेत मिळत नसल्याने कंपन्यांचे अडचण होत असून शासन दरबारी याबाबत प्रयत्न करण्याची मागणी असोसिएशन तर्फे करण्यात आली.
उपासनी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी ज्ञानेश देशपांडे, संदीप देसले, मयूर पांडे आदींसह राज्यभरातील विविध सोलर कंपनीचे प्रतिनिधी आणि संचालक उपस्थित होते. मनीषा एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले. अमित कुलकर्णी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.