Nashik News: मालेगाव धर्मांतराच्या प्रयत्नांची चौकशी करून कारवाई व्हावी; आमदार ढिकले यांची मागणी

Rahul Dhikale
Rahul Dhikaleesakal
Updated on

Nashik News: मालेगाव शहरातील एमएसजी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शनाच्या एका शैक्षणिक कार्यक्रमात हिंदू विद्यार्थ्यांना हिंदू धर्माबद्दल गैरसमजपर माहिती देत बळजबरीने धर्मांतर घडविण्याच्या प्रकाराबद्दल नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. (MLA Dhikle demanded that Malegaon conversion efforts should be investigated and action should be taken nashik news)

श्री. ढिकले म्हणाले, की महाराष्ट्रात धार्मिक तणावाच्या घटना समोर येत असताना ११ जून २०२३ ला मालेगाव येथील एमएसजी महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये हिंदू मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न उघडकीस आला आहे.

संबंधित कार्यक्रमात हिंदू विद्यार्थ्यांची संख्या बहुतांश होती. या कार्यक्रमात करिअर मार्गदर्शनपर व्याख्यान असताना दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना हिंदू धर्माविषयी गैरसमज पसरतील, अशी वक्तव्ये करण्यात आली. धार्मिक तणाव होईल, असा कार्यक्रम होता. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून धर्मांतराचा प्रकार उघडकीस करण्यात आला.

कार्यक्रमाला पुण्यातील डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटचे अनिस कुट्टी यांना निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आर्मी-नेव्ही प्रशिक्षणासंदर्भात माहिती देण्याचे सोडून विशिष्ट धर्म स्वीकारण्यासंदर्भात माहिती देण्यात आली.

Rahul Dhikale
Nashik News: शाळेची वेळ बदलणे हा अंतिम पर्याय नव्हे! पालक- जाणकारांची मतमतांतरे

कुट्टी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. घटनेसंदर्भात केंद्रीय बालहक्क आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीसही बजावली आहे. मात्र, अजूनही कुट्टी यांच्या संस्थेवर कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणाची व घडलेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी.

"दोन धर्मांत तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य कुट्टी यांच्याकडून करण्यात आले. हिंदू संघटनांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. या विरोधात मोर्चाही निघाला होता. शासनाने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशा कार्यक्रमांवर बंदी आणावी." - ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व

Rahul Dhikale
Nashik News: सिन्नरमधील खरेदीप्रकरणी शासनाची केली फसवणूक : आमदार कांदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.