Nashik News : आमदार फरांदे यांच्यामुळे तक्रार असलेल्या कॅफेला ‘टाळे’!

इंदिरानगर जॉगिंग परिसरात असलेल्या एका नामांकित रुग्णालयासमोर कॅफे रियुनियन आणि ‘पीआर लाऊंज’ हॉटेल आहेत.
MLA Devyani Farande Neighbor Chandrakant Khode and citizens inspecting the cafe complained by citizens on Sunday.
MLA Devyani Farande Neighbor Chandrakant Khode and citizens inspecting the cafe complained by citizens on Sunday.esakal
Updated on

इंदिरानगर : परिसरातील एका नामांकित रुग्णालयासमोर असलेल्या कॅफे रियुनियन आणि ‘पीआर लाऊंज’ या कॅफे वजा हॉटेल बाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी या तक्रारीची दखल घेत रविवारी (ता.१४) या कॅफेची पाहणी करत पोलिसांकडे तक्रार केली.

यानंतर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत दोन्ही हॉटेलांना ‘टाळे’ ठोकले. (MLA Farandes complaint about cafe at indiranagar sealed Nashik News)

इंदिरानगर जॉगिंग परिसरात असलेल्या एका नामांकित रुग्णालयासमोर कॅफे रियुनियन आणि ‘पीआर लाऊंज’ हॉटेल आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी युवक युवती येतात. प्रायव्हसीच्या नावाखाली याठिकाणी अश्लील चाळे करतात.

सिगारेट आदी नशेसाठी येणाऱ्या टवाळखोरांच्या दंगा मस्तीमुळे येथील स्थानिक रहिवासी यांना राहणे मुश्कील झाले होते. याबाबत अनेकदा नागरिकांनी तक्रार देखील केली होती. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती.

रविवारी आमदार देवयानी फरांदे या इंदिरानगर भागात कार्यक्रमासाठी आल्या असता नागरिकांनी या कॅफे, हॉटेलबाबत तक्रारी केली. यानंतर या तक्रारीची दखल घेत आमदार फरांदे यांनी नागरिकांसह या कॅफेच्या ठिकाणी पोचले.

एका बंगल्याच्या बाजूने शेडमध्ये तसेच टेरेसवर देखील पत्र्याचे शेड टाकून हा कॅफे सुरू होते. तर दुसऱ्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्येच याच प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याचे बघत आमदार फरांदे देखील चकित झाल्या.

या नंतर आमदार फरांदे यांनी तत्काळ याबाबत इंदिरानगर पोलिसांना घटनास्थळी बोलविले. पोलिस आल्यानंतर त्यांना या सर्व बाबी त्यांनी दाखवत आतापर्यंत तुम्ही काय करत होते ? असा प्रश्न विचारला आणि आत्ताच्या आत्ता कॅफेवर कारवाई करा असे सांगितले. पोलिसांनी देखील कॅफेतील सर्वांना बाहेर काढत कॅफेला टाळे लावले.

MLA Devyani Farande Neighbor Chandrakant Khode and citizens inspecting the cafe complained by citizens on Sunday.
Nashik Political: हिरे-भुसे वादाचा दुसरा अंक सुरू! हिरे यांच्या संस्थेतील कर्मचारी, सभासद कर्ज चौकशीचे सहकारकडून आदेश

तक्रारींकडे दुर्लक्ष

दरम्यान याबाबत स्थानिक माजी नगरसेवकांनी अनेक वेळा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रारी केल्या. पोलिसांकडे देखील अर्ज केले. मात्र दोन्ही विभागाकडून याप्रकरणी कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.

मात्र रविवारी तडका फडकी ही कारवाई झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले . कायमस्वरूपी हा प्रकार बंद करायचा असेल तर तत्काळ अतिक्रमण विभागाने हे अतिक्रमण काढून योग्य कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली.

याबाबत आता स्वतः पोलिसांकडे आणि महापालिकेकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले दरम्यान सोमवारी (ता.१५) मनपा प्रशासन देखील ॲक्शन मोडमध्ये आले.

पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव आणि सहकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन संबंधित कॅफे चालकास तत्काळ अतिक्रमण काढण्यास सांगितले.

"रस्त्यावरून येणारे जाणारे टवाळखोर येथे दंगा मस्ती करतात. हॉटेलमध्ये असा प्रकार होत नाही. तातडीने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेणार असल्याने कुणाला काही शंका असेल तर कोणत्याही वेळेस येऊन ते तपासणी करू शकतील."- मोईन पठाण, कॅफे चालक

MLA Devyani Farande Neighbor Chandrakant Khode and citizens inspecting the cafe complained by citizens on Sunday.
Nashik News : भारती, तुला काय व्हायचे आहे? PM मोदी यांचा कावनईच्या भारती रणला सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()