Nashik News : ZPच्या निधी नियोजनात अखेर आमदार कांदे यांना रस्त्यांसाठी निधी मिळाला!

suhas kande latest marathi news
suhas kande latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेला २०२२-२३ या वर्षी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर निधी नियोजनात आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव तालुक्याला निधी न मिळाल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिध्द केले होते.

बांधकाम (तीन)मध्ये उर्वरित निधी नियोजनात नांदगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी ७० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे समजते. याबाबतची फाईल जिल्हा परिषदेत फिरत असल्याचे बोलले जात आहे. (MLA Kande nandgaon finally got funds for roads in ZP fund planning Nashik News)

पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार बांधकामच्या एक, दोन व तीन या तिन्ही विभागांतर्फे प्रशासकीय मान्यता दिल्या जात आहे. याच दरम्यान, आमदार कांदे या नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यापूर्वीच पत्र देऊन सर्व तालुक्यांना समान पद्धतीने निधी वाटप करावे, असे पत्र दिले होते.

असे असतानाही बांधकाम विभाग तीनच्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांनी त्यांच्याकडील उपलब्ध ३१.६० कोटी रुपयांच्या निधीतून प्रत्यक्ष १९.७५ कोटी रुपयांचे नियोजन केले. यात, आमदार कांदे यांच्या नांदगाव तालुक्याला निधी देण्यात आला नव्हता. ५०५४ या लेखशीर्षातूनही देय असलेल्या निधीच्या केवळ ८७ टक्के निधी मंजूर केला आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

suhas kande latest marathi news
Nashik News | सिडकोतील वरद विनायक गणपती उद्यान : खेळण्या तुटलेल्या अवस्थेत; ग्रीन जिम फक्त नावाला

पालकमंत्री भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीत गतवर्षी अधिक निधी दिलेल्या तालुक्याना यंदा कमी निधी दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यांच्या या धोरणाचा फटका त्यांच्याच पक्षाच्या आमदाराला बसला असल्याची चर्चा होती. त्यानंतर, आमदार कांदे यांनी प्रशासनाला जाब विचारल्याची चर्चा रंगली होती.

मात्र, बाँधकाम विभागाने उर्वित असलेले निधी नियोजन अंतिम केले आहे. यात नांदगाव तालुक्याला ७० लाखांचा निधी मंजूर केला असल्याचे समजते. पालकमंत्री भुसे यांनी आमदार कांदे यांना निधी देत वादावर पडदा टाकला असल्याचे बोलले जात आहे.

suhas kande latest marathi news
Nashik News : पुरेशा सुविधा मिळत नसल्याने चापडगाव आश्रम शाळेचे विद्यार्थी उतरले रस्त्यावर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()