MLA Nitin Pawar: कळवण-सुरगाण्यात विकासकामातून फुलतेय नंदनवन

MLA Nitin Pawar
MLA Nitin Pawaresakal
Updated on

"कळवण हा आदिवासीबहुल तालुका. वर्षानुवर्षे येथील जनता विकासापासून दूर होती. त्यांना प्राथमिक सुविधांबरोबरच रस्ते, वीज, पाणी आणि मुख्य म्हणजे शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत विकासाचा दीर्घकालीन आराखडा तयार केला. तो शासनाकडे देत विकासाचे चित्र वास्तवात उतरविण्यासाठी माजी आदिवासी विकासमंत्री स्व. ए. टी. पवार यांनी अहोरात्र मेहनत केली. कळवण मतदारसंघात हरितक्रांती घडविली, तशीच क्रांती सुरगाणा तालुक्यात करण्याचा ध्यास उराशी बाळगून सुरगाण्यातील अनुशेष भरून काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. गेल्या चार वर्षांत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण-सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी १,१०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला. त्यांच्याच माध्यमातून २०२३ अर्थसंकल्पातून त्यांनी १४० कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मतदारसंघाला प्राप्त करून घेत विकासकामांचा हा रथ सुरू आहे. त्याला जनतेची साथ यापुढेही नक्कीच मिळेल, असा आत्मविश्वास आमदार नितीन पवार यांनी व्यक्त केला. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना मतदारसंघाच्या विकासाची ब्ल्यूप्रिंटच जनतेसमोर मांडली."

- रवींद्र पगार, कळवण

(MLA Nitin Pawar birthday Paradise blooming in Kalwan Surgana due to development work nashik)

१) मतदारसंघातील कोणत्या प्रश्नाला आपण सर्वाधिक प्राधान्य देता?

आमदार पवार : कळवण-सुरगाणा मतदारसंघ हा तसा डोंगराळ भाग जास्त असलेला प्रदेश आहे. येथे पाऊस भरपूर होत असला, तरी बारमाही सिंचनासाठी त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सुविधा निर्माण करण्यावर माझा प्रामुख्याने भर आहे.

केवळ बोलून प्रश्न मार्गी लागत नाही, तर त्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असते. त्याला महत्त्व देऊन ओतूर धरणासह जामशेत, पुनंद योजना आणि सुरगाणा तालुक्यात पाणी अडविण्याच्या योजना मार्गी लावणे हे स्व. ए. टी. पवारांचे स्वप्न साकार करायचे आहे.

दोन्ही तालुक्यांत सिमेंट बंधारे ही सिंचनव्यवस्था गावोगावी उभी करणे सुरू आहे. सुरगाणा तालुक्यात जलसंधारणाच्या माध्यमातून छोटे छोटे बंधारे, पाझर तलाव बांधण्याचे नियोजन आहे.

गावपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती, नूतनीकरण केले जात आहे. अनेक गावांमध्ये विजेचा भेडसावणारा प्रश्न मार्गी लावला. मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहे.

२) मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या कामांबाबत काय सांगाल?

आमदार पवार : गावपातळीवरील वैद्यकीय सुविधांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. हे प्रश्न सोडविताना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात पुरेशा सुविधा असतील, याकडे आवर्जून लक्ष दिले जात आहे.

मतदारसंघातील विविध विकासकामे, सिंचन योजना, अनुदान, नुकसानभरपाई, रस्ते, पूल, शिक्षण, सिंचन, वीज, पर्यटन, आरोग्य आदी विभागांकडून गेल्या साडेतीन वर्षांत ४७४ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून निधी उपलब्ध करून बहुतांश कामे मार्गी लागत आहेत.

विकासकामांचा धडाका सुरू आहे. गावांतर्गत रस्ते, गटारी, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह आदी कामांना प्राधान्य दिले आहे.

३) या अधिवेशनात मतदारसंघातील कोणते प्रश्न विधानसभेत मांडले?

आमदार पवार : अर्थसंकल्प अधिवेशनात मतदारसंघातील विविध विकासांची १२४ कोटी १७ लाख रुपयांची विकासकामे मंजूर केली. शिवाय विकासकामांना दिलेली स्थगिती उठविण्यात यावी यांसह ओतूर, जामशेत, वांगण-सुळे लघुपाटबंधारे प्रकल्पांना निधी मिळावा.

कनाशी १३२/३३ केव्ही उपकेंद्र, सप्तशृंगगड- नांदुरी- अभोणा-कनाशी- आलियाबाद रस्त्यास एडीबी (ADB) अंतर्गत मंजुरी द्यावी, उंबरठाण येथे ग्रामीण रुग्णालय, सुरगाणा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व भेंडी येथे औद्योगिक वसाहत, आदिवासीचे स्थलांतर,

८२ ठिकाणी जोडरस्ते मंजूर करावे. सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रकल्पासह विविध विषयांच्या अनुषंगाने ऑनलाइन प्रश्न उपस्थित केले.

विविध महत्त्वाचे अकरा प्रश्न सभागृहात उपस्थित झाल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांना चालना मिळाली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

MLA Nitin Pawar
Ajit Pawar : अजित पवार कधी होणार राज्याचे मुख्यमंत्री ? भाजप नेत्याची भविष्यवाणी

४) यंदाच्या वर्षातील महत्त्वाची कामगिरी म्हणून कशाकडे पाहता?

आमदार पवार : मतदारसंघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गासाठी ३३ कोटी ५० लाख, मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ते ४२ कोटी २० लाख, ग्रामीण रस्त्यासाठी ३४ कोटी ७५ लाख, कळवण बसस्थानक सुशोभीकरण व वाहनतळ काँक्रिटीकरणसाठी सात कोटी ९५ लाख,

तर सुरगाणा बसस्थानक सुशोभीकरण व वाहनतळ काँक्रिटीकरणासाठी चार कोटी १७ लाख रुपये, शासकीय विश्रामगृह कळवणसाठी एक कोटी ६० लाख रुपये, अशी १२४ कोटी १७ लाखांची कामे अर्थसंकल्प अधिवेशन २०२३ मध्ये मंजूर करून कळवण-सुरगाणा तालुक्यात विकासाची गंगा आणली आहे.

आदिवासी विकास विभागाकडून ८७ कोटी रुपये, नाबार्डकडून पुलांच्या कामासाठी १४ कोटी ६२ लाख रुपये निधी मंजूर केला. कळवण-सुरगाण्यात १९ तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयांच्या इमारतीसाठी चार कोटी ७५ लाख रुपये, तर पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.

५) विकासकामांबाबत जनता समाधानी आहे का, आणखी काय योजना आहेत?

आमदार पवार : सर्वसामान्य जनता, आदिवासी व शेतकरीबांधव हाच केंद्रबिंदू मानून अविरत प्रयत्न करीत आहे. चणकापूर उजवा कालवा, सुळे उजवा व डाव्या कालव्यांचे पाण्याचे हक्काचे आवर्तन शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी पाण्यावर हक्क अबाधित ठेवून पाणी आरक्षित करणे,

गिरणा आणि पुनंद नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवून सिंचन वाढविणे, वनजमीन कायद्यांतर्गत आदिवासी जनतेला लाभ मिळवून देत आहे. विजेचा प्रश्न मार्गी लावला आहे. माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांनी नेहमीच पाणीप्रश्नाला महत्त्व देऊन तालुक्यात विविध भागात योजना राबविण्यावर भर दिला होता.

त्याच धर्तीवर कळवण व सुरगाणा तालुक्यात सिमेंट बंधाऱ्याचे जाळे विणले. सिंचनाची आणि रस्त्याची कामे मार्गी लावल्यामुळे विश्वासाचे नाते निर्माण झाले. विकासकामे हा केंद्रबिंदू मानला असल्याने जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.

MLA Nitin Pawar
Sharad Pawar: शरद पवार स्पष्ट कधीच बोलत नाहीत तर उद्धव ठाकरे.. नितीन गडकरींना खुपणारी गोष्ट Nitin Gadkari

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.