आमदार देवयानी फरांदेंच्या पवित्र्याने नाशिकमध्ये भाजप अडचणीत

Devyani Pharande
Devyani PharandeSakal
Updated on

नाशिक : शहरात गेल्या पाच वर्षातील डेंगी, चिकूनगुनिया आजाराने उच्चांकी संख्या गाठल्याने पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिला. फरांदे यांच्या पवित्र्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजप मात्र अडचणीत सापडला असून, प्रशासनावर अंकुश नसल्याची बाब स्पष्ट होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू असताना डेंगी व चिकूनगुनिया आजाराने तोंड वर काढले आहे. महापालिकेकडे प्राप्त होणाऱ्या आकडेवारीपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगी व चिकूनगुनियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात औषधांची फवारणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात शहरात ३११ नागरिकांना डेंगीचा बाधा झाली होती, तर चिकूनगुनियाचे २१० रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात १४० डेंगीचे रुग्ण आढळले. चिकूनगुनियाचे ९५ रुग्ण आढळले. मागील पाच वर्षात सर्वाधिक डेंगी व चिकूनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. १ जानेवारी ते १४ सप्टेंबर या कालावधीत ७१७ डेंगीचे तर ५३७ चिकूनगुनियाचे रुग्ण आढळले. गेल्या पाच वर्षातील ही सर्वाधिक आकडेवारी असल्याची बाब समोर आल्यानंतर डेंगीवर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आरोग्य विभागावर ताशेरे ओढले.

Devyani Pharande
नाशिकमध्ये डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांचा ५ वर्षांतील उच्चांक

आ. फरांदे यांनी आयुक्त कैलास जाधव यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचून डेंगीचा प्रसार होत आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. धूर व औषध फवारणी ठेकेदाराकडून योग्य काम होत नसल्याने आजार बळावत आहे. ठेक्यासाठी दिलेली बेकायदेशीर मुदतवाढ रद्द करून पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नवीन ठेकेदार नियुक्त करावा. त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना आरोग्य विभाग निद्रिस्त आहे. आरोग्य विभागाकडे डेंगी, चिकूनगुनिया बाधित रुग्णांची व या आजाराने मृत झालेल्या रुग्ण संख्येची माहिती नाही, ही बाब आश्‍चर्यकारक आहे. आजारासंदर्भात माहिती देण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइनची मागणी आमदार फरांदे यांनी केली.

Devyani Pharande
मतदार यादीत दुबार नावे; जिल्हाधिकाऱ्यांचा फौजदारी कारवाई इशारा

महापौर कार्यालयालाही टाळे ठोकावे : बोरस्ते

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आमदार फरांदे यांनी डेंगी व चिकूनगुनियाच्या मुद्यावरून प्रशासनावर निशाणा साधला असला तरी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असल्याने भाजप अडचणीत आला आहे. भाजपमधील सुंदोपसुंदीचा फायदा घेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी साथीचे आजार वाढण्यास महापालिकेतील सत्ताधारी भाजपदेखील जबाबदार असल्याचा आरोप केला. प्रशासनावर अंकुश नसल्याने नागरिकांचा बळी जात आहे. आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा म्हणजे सत्ताधारी भाजपच्या अपयशाची कबुली आमदार फरांदे यांनी दिली आहे. त्यामुळे फक्त आरोग्य विभाग नव्हे तर महापौर कार्यालयालाही टाळे ठोकावे, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()