‘Smart City’ ला शोबाजी आली अंगलट; आमदार ढिकले यांचा सभात्याग

MLA Adv. Rahul Dhikale
MLA Adv. Rahul Dhikaleesakal
Updated on

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात विशेषतः गावठाणात सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असताना लोकप्रतिनिधींना कामे दाखविण्यासाठी शुक्रवारी (ता. २३) बोलविण्यात आलेली बैठक स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या चांगलीच अंगलट आली.

कामाचे सादरीकरण करत असतानाच आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी नाशिककरांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली. अधिकाऱ्यांना धारेवर धरताना गुणवत्तापूर्ण व वेळेत कामे पूर्ण न झाल्यास याद राखा, असा सज्जड दम देत सभात्याग केला. (MLA Rahul Dhikale Abandoned meeting of smart city Nashik News)

स्मार्टसिटी कंपनीचा कारभार स्थापनेपासूनच वादात आहे. कंपनीकडून एकूण 52 प्रकल्प हाती घेण्यात आले, त्यातील 50 टक्के प्रकल्पदेखील अद्यापही पूर्ण झालेले नाही. सर्वाधिक किमतीचा व महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून गावठाण विकासाचे काम दीड वर्षांपासून हाती घेतले आहे. कामाची प्रगती अगदी धीम्या गतीने सुरू आहे.

कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या गावठाण विकासाच्या माध्यमातून भविष्यात लाभ व्हायचा तेव्हा होईल, मात्र सध्या गावठाणातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. कंपनीने जागोजागी खड्डे खोदून ठेवले आहे. रस्त्यांसाठी खड्डे खोदल्याने जलवाहिन्यादेखील तुटल्या. त्यामुळे दररोज कुठे ना कुठे पाणीपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा, दूरध्वनी लाईन खंडित होणे हे प्रकार नित्याचे झाले आहे.

स्मार्टसिटीचे कामकाज चांगल्या पद्धतीने चर्चेत येण्याऐवजी चोहोबाजूने टीका सुरू आहे. टीकेची धार कमी करण्यासाठी कामाची गुणवत्ता राखणे दूर स्मार्टसिटी कंपनी अधिकाऱ्यांकडून पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा फंडा अवलंबला जात आहे. महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना या माध्यमातून माहिती देऊन टीका कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी स्मार्टसिटी कंपनीचे अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली.

MLA Adv. Rahul Dhikale
Nashik : भुजबळांनी MVP संस्थेस दिली 5 लाखांची देणगी

आमदार ॲड. राहुल ढिकले एकमेव बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला गावठाणात सुरू असलेल्या कामांची माहिती ढिकले यांना देण्यात आले. मात्र, माहिती देण्याचे काम सुरू असतानाच ढिकले यांनी कामांबद्दल संताप व्यक्त केला. गावठाणात काम कसे चालू आहे, याची पूर्ण माहिती आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतर ते दिसतेच. खड्डा खोदल्यानंतर बॅरीकेड्स लावणे गरजेचे असते, मात्र ते देखील लावले जात नाही.

यातून अपघात होतात, वाहतूक ठप्प तर होतेच शिवाय पाणी व वीजपुरवठा कामांमुळे सातत्याने खंडित होतो. प्रत्येक कामासाठी कालावधी ठरवून दिला असताना वेळेत कामे होत नाही. परिणामी नाशिककरांना व विशेष करून गावठाणातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या सर्वाला स्मार्टसिटी कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करताना ढिकले यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.

"स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून गावठाण भागात सुरू असलेल्या कामांचा बोजवारा उडाला आहे. वेळेत काम तर होत नाही, मात्र ते कामे गुणवत्ता पूर्ण होत नाही. ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून कामे दिली जात आहे. नाशिककरांच्या रोजच्या तक्रारीच्या अनुषंगाने कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला मात्र अपेक्षित उत्तरे मिळाली नाही म्हणून सभात्याग करावा लागला." - ॲड. राहुल ढिकले, आमदार

MLA Adv. Rahul Dhikale
Navratrotsav 2022 : आदिशक्तीचे नवरूपाचे दर्शन नवआभुषणांसह भाविकांना घडणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.