MLA Satyajeet Tambe : दुग्धव्यवसायाकडे तरुणांनी संधी म्हणून पहावे; आमदार सत्यजित तांबे

While felicitating MLA Satyajit Tambe, Narayan Waje, Arun Warungse, Ambadas Waje, Dr. Ramdas Naikwadi and graduate voters
While felicitating MLA Satyajit Tambe, Narayan Waje, Arun Warungse, Ambadas Waje, Dr. Ramdas Naikwadi and graduate votersesakal
Updated on

MLA Satyajeet Tambe : सहकार, शिक्षण क्षेत्राबरोबरच इतरही समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, मात्र शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे तरुणांनी संधी म्हणून पाहिले पाहिजे असे प्रतिपादन नवनिर्वाचित पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले. (MLA Satyajeet Tambe statement Dairying should an opportunity by youth nashik news)

सिन्नर तालुक्यातील आभार दौऱ्याप्रसंगी येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेला त्यांनी भेट देत आपल्याला निवडणुकीत मदत केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले,‘ सहकारामुळेच गावाचा, तालुक्याचा विकास शक्य आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरला सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे संगमनेरचा आज सर्वांगिण विकास झाला आहे. सिन्नर तालुक्यातील पतसंस्थांची माहिती जाणून घेत श्रीमंतच्या कारभारावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी आपण कायम सोबत असल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिकतेची कास धरुन दूग्ध व्यवसाय कसा वाढविला पाहिजे याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. आज आपण महागडी जनावरे घेऊन पाहिजे तसे दुधाचे उत्पादन घेत नाही. त्यामुळे गावातील तरुणांचा दूध व्यवसायाचा अभ्यासदौरा घडवून आणावा.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

While felicitating MLA Satyajit Tambe, Narayan Waje, Arun Warungse, Ambadas Waje, Dr. Ramdas Naikwadi and graduate voters
Nashik News : शहा- वावी वीजवाहिनीचे काम रेंगाळले; 8 दिवसात वीज जोडणीची घोषणा हवेत

संस्थेचे व्यवस्थापक अय्युब शेख यांनी थोरात व तांबे घराण्याचे योगदान सांगत त्यांना आलेल्या अनुभवांना उजाळा दिला. तांबे व थोरात यांचे राजकारणाबरोबरच समाजकारणातही मोठे योगदान असल्याचे शिवाजी साळवे यांनी सांगितले.

थोरात व तांबे कुटुंबीयांचे डुबेरकरांवर विशेष प्रेम आहे. कायम तुमच्याबरोबर आहोत अशी ग्वाही वाजे यांनी आमदार तांबे यांना दिली. तत्पूर्वी संस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, उपाध्यक्ष अरुण वारुंगसे यांनी त्यांचे स्वागत करत सत्कार केला.

गणेश वाजे यांनी परिचय करून दिला. प्रा. एकनाथ माळी यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अरुण वारुंगसे यांनी आभार मानले.

शंकरराव वामने, अॅड. प्रदिप वारुंगसे, कार्यकारी संचालक महेश कुटे, शिक्षक नेते अंबादास वाजे, डॉ. रामदास नाईकवाडी, अशोक गवळी, शरद माळी, अर्जुन वाजे, सुनील सोनवणे, प्रवीण वामने, प्रा. रामदास वारुंगसे, नवनाथ ढोली, वामने, प्रा. दीपक वाजे, वसंत जाधव, किरण वाजे आदींसह पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

While felicitating MLA Satyajit Tambe, Narayan Waje, Arun Warungse, Ambadas Waje, Dr. Ramdas Naikwadi and graduate voters
Water Crisis : लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न पेटला! 22 ते 25 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.