MLA Satyajeet Tambe: एकस्तर वेतनश्रेणी सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील : आमदार सत्यजित तांबे

Principal Vadje and activists along with MLA Satyajit Tambe at Janata School on Thursday.
Principal Vadje and activists along with MLA Satyajit Tambe at Janata School on Thursday.esakal
Updated on

दिंडोरी : आदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून, सर्व शैक्षणिक क्षेत्रातील व पदवीधर यांच्या अडीअडचणी सोडविणार आहे,

अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी गुरुवारी (ता. १२) येथे दिली. येथील जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात आभार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. (MLA Satyajeet Tambe statement Striving to continue single tier pay scale nashik)

आमदार तांबे म्हणाले, की सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. अतिशय बारकाईने खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करीत आहे. माझ्या वाडवडिलांनी समाजहिताची कामे केली, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

तुम्ही मला निवडून दिले. माझ्यावर विश्वास ठेवला. त्यास मी तडा जाऊ देणार नाही. आपले पेन्शनर्स, एकस्तर खासगीकरण, कंत्राटी भरती यांसारख्या समस्या सरकारपर्यंत मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करेल.

आपण जी डिजिटल वर्गाची मागणी केली ती मी पूर्ण करेल. आपण केव्हाही कोणत्याही अडीअडचणी असतील, तर मला सांगा. मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, श्री. कोल्हे, छब्बू मटाले, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन वडजे, प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य उत्तम भारसठ, पर्यवेक्षिका एन. पी. चौधरी, पी. ई. मापारी, श्रीमती एस. पी. शिंदे आदी उपस्थित होते.

प्राचार्य रमेश वडजे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुधीर तांबे यांनी विद्यालयास अनेक वस्तूरूपी देणग्या दिल्या, तसेच संगणक दिले. वारंवार शिक्षकांच्या समस्या सोडविल्या तेच कार्य आपणही करीत आहोत.

Principal Vadje and activists along with MLA Satyajit Tambe at Janata School on Thursday.
Nashik Police: सोनसाखळी चोरट्यांवर CCTVचा वॉच! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज

भविष्यातील विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न आपण करावा, तसेच विद्यालयास डिजिटल वर्ग द्यावेत, अशी अपेक्षा श्री. वडजे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

शिक्षक संतोष कथार यांनी सत्यजित तांबे युवानेते आहेत. ते सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. खेड्यापाड्यांपर्यंत जनसंपर्क आपण वाढविला. डीएड लोकांना मतदानाचा हक्क द्यावा, अशी मागणी केली.

एकस्तर वेतनश्रेणी कायम लागू ठेवावी. जुनी पेन्शन योजना लागू करावी. आजचे चाललेले खासगीकरणास विरोध करावा, अशा मागण्या श्री. काथार यांनी केल्या. जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी सत्यजित तांबे यांना थोरामोठ्यांच्या विचारांचा वारसा आहे.

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून ते काम करतात. यात तीळमात्र शंका नाही, असे विचार व्यक्त केले. संतोष कथार यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षिका एस. एम. वीरकर यांनी आभार मानले

Principal Vadje and activists along with MLA Satyajit Tambe at Janata School on Thursday.
Navratrotsav 2023: कालिका मंदिरात रविवारपासून नवरात्रोत्सव! यात्रोत्सवाची तयारी अंतिम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.