Water Tanker: पिण्याच्या पाण्यासाठी स्वखर्चातून 10 टॅंकर : आमदार सुहास कांदे

दुष्काळी स्थितीमुळे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन
MLA Suhas Kande provided ten water tankers and bicycles for the disabled to the public at his own expense
MLA Suhas Kande provided ten water tankers and bicycles for the disabled to the public at his own expenseesakal
Updated on

Water Tanker : तालुक्यासह सर्व मतदारसंघावर दुष्काळाचे सावट घोंघावत असताना आपला वाढदिवस साजरा न करता दुष्काळसदृश परिस्थितीत जनतेने खचून जाऊ नये यासाठी विविध लोकोपयोगी सुविधा देण्यासाठी आमदार सुहास कांदे सरसावले आहेत.

त्याचाच भाग म्हणून आमदार कांदे यांनी वैयक्तिक खर्चातून पिण्याच्या पाण्याची वाहतूक करणारे दहा जलरथ, आरोग्याच्या दृष्टिकोनातून व वैद्यकीय निदान वेळेवर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्ससह फिरता दवाखाना त्यासोबत आधुनिक वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण तीन नव्या रुग्णवाहिका दिव्यांग बांधवांसाठी शंभर सायकली, मोतीबिंदूची शस्रक्रियेसाठी स्वतंत्र बस आदी सुविधांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. (MLA Suhas Kande 10 tankers for drinking water at own expense nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MLA Suhas Kande provided ten water tankers and bicycles for the disabled to the public at his own expense
Nashik News: 6 हजार कुटुंबे घरकुलापासून वंचित! पिंपळगाव शहरातील झोपडपट्टी ठरतेय कळीचा मुद्दा

मतदारसंघातील जास्तीत जास्त तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याही घेण्यात येणार आहे. मुलाखती नंतर थेट नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. विविध शासकीय दाखले देण्यासाठी मोफत सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आमदार कांदे यांनी सांगितले की पाऊस लांबल्याने दुष्काळी परिस्थिती उभी राहिली आहे. या संकटाच्या काळात जनतेला धीर देणे हे माझे कर्तव्य असून सर्वसामान्य जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी लोकोपयोगी विधायक कामांची उपलब्धता करून देण्यास मी प्राथमिकता दिली आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपण वाढदिवस साजरा करणार नाही निवासस्थानी जनतेला भेटण्यासाठी आपण उपलब्ध असून कुठल्याही प्रकारचे हारतुरे स्वीकारणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

MLA Suhas Kande provided ten water tankers and bicycles for the disabled to the public at his own expense
Nashik News: प्राथमिक शिक्षकांकडील BLOची कामे रद्द करा! शिक्षक समन्वय समितीतर्फे प्रशासनाला निवेदन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.