MNS Toll Plaza Agitation: पिंपळगाव टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन; टोलचे दांडे बाजूला सारून वाहनांना मोफत प्रवास

MNS Agitation on Pimpalgaon Toll Plaza
MNS Agitation on Pimpalgaon Toll Plazaesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : राज ठाकरे यांच्या आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. टोलचा झोल थांबलाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत पिंपळगाव टोल दणाणून सोडला.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन तास जोरदार आंदोलन केले. दोन दिवसांत टोल बंद न झाल्यास टोलनाका जाळून टाकू, अशा इशारा पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला. आंदोलनावेळी टोलचे दांडे बाजूला सारून पदाधिकाऱ्यांनी वाहनांना मोफत प्रवास घडविला. (MNS Agitation on Pimpalgaon Toll Plaza Free travel for vehicles by removing toll poles nashik)

आमचे कार्यकर्ते आता टोलनाक्यावर उभे राहतील, असा इशारा दिल्यानंतर मनसेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वाधीक वादग्रस्त असलेला पिंपळगाव टोलनाका गाठला. मनसेचे झेंडे फडकिवत जोरदार घोषणाबाजी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छोट्या वाहनांना पथकर नसल्याच्या वक्तव्यांचा व्हिडिओ या वेळी टोल व पोलिस प्रशासनाला दाखविला.

शासनाने टोलवसुली बंद केली असताना, कारचालकांकडून पथकर का घेतला जातो, असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. या वेळी पोलिस व मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही वेळ बाचाबाची झाली. आम्ही जनजागृती करीत असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले.

‘टोलचा झोल थांबलाच पाहिजे’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. टोल भरू नका,असे आवाहन या वेळी करण्यात आली. टोलचे दांडे बाजूला करून विना टोल वाहने सोडण्यास सुरवात केली.

MNS Agitation on Pimpalgaon Toll Plaza
Nashik: वेदविद्येच्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी! भोसला महाविद्यालय, गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानमध्ये करार

दोन तासांनंतर आंदोलन थांबले. प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, जिल्हाध्यक्षा ज्योती शिंदे, अक्षरा घोडके, प्रकाश गोसावी, संजय मोरे, स्वागता उपासनी, राजू भवर, सतीश पाटील, गणेश देशमाने, जयेश ढिकले आदी उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह तगडा पोलिस बंदोबस्त होता. टोलचे व्यवस्थापक आत्माराम नथले यांनी आंदोलनाची माहिती प्रशासनाला कळविण्यात आल्याचे सांगितले.

"मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर छोट्या वाहनांना टोल न भरता सोडण्यासाठी आम्ही पिंपळगाव टोलनाक्यावर थांबलो. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची पथकरांबाबतचा व्हिडिओ नागरिकांना दाखवून जनजागृती केली. लूट थांबविण्याचा आमचा प्रयत्न आहे."

-प्रकाश गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष, मनसे

MNS Agitation on Pimpalgaon Toll Plaza
Nashik: पालखेड कालव्याच्या पाट पाण्यासाठी प्रहारचे उपोषण! गरज असताना, पाणी मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.