Raj Thackeray Nashik : मी येतोय, तुम्ही तयारीला लागा; राज ठाकरेंचा नाशिकमध्ये तळ

मनसेप्रमुख राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये चार दिवसांचा तळ ठोकणार आहे.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

Raj Thackeray Nashik : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नुकताच झाला, तर शिवसेनेच्या (उबाठा) गटाकडून राज्यव्यापी अधिवेशन झाले.

आता मनसेप्रमुख राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये चार दिवसांचा तळ ठोकणार आहे. (MNS chief Raj Thackeray will come in Nashik for four days in February nashik news)

तर लोकसभेला महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी करण्यासाठी मनसेकडून उमेदवार उभा करण्याची रणनीती आखणार आहे. १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री काळाराम मंदिराला भेट दिली. त्याचबरोबर गोदाघाटावर गोदा नदीची पूजा केल्याने सर्व वातावरण भाजपमय झाले.

त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासमवेत श्री काळाराम मंदिरात आरती करण्याबरोबरच गोदावरी आरती केली. त्यामुळे ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. २२ व २३ जानेवारीला शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन झाले. या अधिवेशनात शेतकरी, कामगारांशी संबंधित तीन ठराव करण्यात आल्याने निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची दिशा स्पष्ट झाली.

Raj Thackeray
Raj Thackeray : पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दलचं प्रेम लपवता येत नसेल तर...; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधानांच्या दौऱ्यात सहभागी होते. सहकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा २८ जानेवारीला त्यांचा दौरा आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट व भाजपकडून नाशिकमध्ये लोकसभेची तयारी सुरू झाली असताना एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे चार दिवस तळ ठोकणार आहे.

१ ते ४ फेब्रुवारी असा त्यांचा दौरा असेल. नुकतीच मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तयारीला लागा मी येतोय, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. निवडणूक तयारीचा भाग म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सरचिटणीस किशोर पाटील यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनीही पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा ठाकरेंकडे सादर केला आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray Nashik Daura : राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

महाविकास आघाडीला अडचण

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १ ते ४ फेब्रुवारी असे चार दिवस ठाकरे नाशिकमध्ये मुक्काम ठोकतील. यात लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांची रणनीतीवर खल होईल. लोकसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवार उभा केला जाणार आहे.

उमेदवारी देताना महाविकास आघाडीला धोका निर्माण होईल अशी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभागणी करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता कमी करण्याचे डावपेच असल्याचे बोलले जात आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray यांनी गाऱ्हाण घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न केला | MNS | Nashik

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.