नाशिक : महापालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक नाशिक घेण्याची घोषणा केली, परंतु नाशिक दत्तक मोहीम फोल ठरल्याने नाशिककरांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत मनसे स्वबळावरच निवडणुका लढविणार असून, पुन्हा एकदा महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकावू असा दावा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी करताना या निवडणुकीत भाजपच प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याचे स्पष्ट केले. (MNS criticized BJP Nashik adoption campaign for failing)
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे व संदीप देशपांडे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देशपांडे बोलत होते. ते म्हणाले, भाजपच्या साडेचार वर्षातील सत्ता काळाचा विचार करता नाशिककरांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजप व मनसे सत्ताकाळाचा विचार करता मनसेच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात कामे झाली. राज ठाकरे यांचे नाशिकवर विशेष प्रेम असल्याने सामाजिक दायित्वाच्या निधीतून नाशिकमध्ये मोठे प्रकल्प आणले. यापूर्वी असे प्रयोग कोणी केले नाही. आगामीकाळात सत्ता आल्यास नाशिकसाठी नवीन प्रकल्पाबरोबरच देशातील सुंदर शहर घडविण्याचा प्रयत्न राहील. मागील काळात मनसे मार्केटिंगमध्ये कमी पडले. काही पक्ष कामे एक रुपयाची करतात व दाखवितात शंभर रुपयांची. मनसेने जी कामे केली तिचं लोकांसमोर मांडल्याचे देशपांडे म्हणाले. या वेळी प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार आदी उपस्थित होते.
दूरदृष्टीच्या नेत्यांकडे सत्ता द्या
सरकार पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. सोळा फुटांवर पुराचे पाणी पोचल्यानंतर प्रशासनाला जाग आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूल बांधण्याच्या वक्तव्यावर बोलताना नद्यांवर भिंत बांधल्याचे कोणी ऐकलंय का, असा सवाल करताना सरकार नागरिकांची चेष्टा करत सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप केला. समुद्रात शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली होती. कुठे आहे ते शिवस्मारक, असा सवाल करताना दूरदृष्टी असलेल्या नेत्यांकडे सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.