सिडको (नाशिक) : मागील साडेचार वर्षाच्या कालावधीत सिडको परिसरात मनसे पक्षाची नागरिकांच्या मनात भरेल, अशी एकही कामगिरी फारशी दिसून आली नाही. भविष्यात मनसेला येथे खरोखर नगरसेवकपदाचा भोपळा फोडायचा असेल तर त्याकरिता सक्षम नेतृत्वाकडे जवाबदारी सोपविण्याची गरज असल्याचे मत मनसैनिक व नागरिकांमध्ये व्यक्त होताना दिसून येत आहे. (MNS needs competent leadership at CIDCO)
सिडको- अंबड परिसर तसा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सध्या परिस्थितीत येथे एकूण पाच प्रभाग असून, शिवसेनेचे १२, भाजपचे ७, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा १ नगरसेवक, अशी संख्या आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत मनसेला एकही जगा मिळवता आली नाही, हे मनसे नेतृत्वाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. एवढे असतानाही मागील साडेचार वर्षांपासून आतापर्यंत सक्षम नेतृत्व न मिळाल्याने आजही जैसे थेच परिस्थिती दिसून येत आहे. भविष्यात मनसेला नगरसेवकपदाचा भोपळा फोडायचा असेल तर त्याकरिता सक्षम, उत्साही व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या डॅशिंग नेतृत्वाकडे जबाबदारी सोपविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त होताना दिसून येत आहे.
तीन पक्षांमध्ये रस्सीखेच
सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवसेना-भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असून त्यांचा बोलबाला सगळीकडे बघायला मिळत आहे. या पक्षांचे कोरोनातील कार्य, आंदोलन, मोर्चे, निवेदने, उपोषण व विविध सामाजिक उपक्रम नेहमी लक्षणीय ठरले. त्यामुळे हे तिन्ही पक्ष सध्या नागरिकांच्या चर्चेचे विषय ठरत आहेत. त्या मानाने काँग्रेस खालोखाल म्हणजेच मनसे पक्ष दिसून येतो. यातील काही बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी अधून-मधून झळकताना दिसतात. तर वरच्या फळीमधील नेतृत्व फारसे काही बघायला मिळत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
लवकर पावले उचलणे गरजेचे
मनसेला शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बरोबरीने मुकाबला करायचा असेल तर सक्षम नेतृत्वाकडे जबाबदारी सोपविण्याची गरज आहे. येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यासाठी लवकर पावले उचलणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर नाशिकसह सिडकोवासीयांचे नितांत प्रेम असून, त्याचा फायदा मात्र मनसे पदाधिकाऱ्यांना उचलता येऊ नये, यापेक्षा दुसरे दुर्भाग्य ते कोणते.
(MNS needs competent leadership at CIDCO)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.