MNS Election Preparation : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्षप्रमुख राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले असून, १८ ते २० मे या तीन दिवसांत नाशिकसह औरंगाबाद, धुळे व जळगाव महानगरपालिका निवडणुकांचे रणनीती आखली जाणार आहे. (MNS preparing for nmc election Raj Thackeray Ground nashik political news)
राज्यातील सत्ता संघर्ष संदर्भात गुरुवारी निकाल लागला. विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण पाठवण्यात आल्याने राज्यातील सरकार बचावले आहे. त्यामुळे तूर्त तरी सत्ता संघर्षावर पडदा पडल्याने आता महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.
मुंबई, नाशिक, पुणे या महत्त्वाच्या महापालिकांसह राज्यातील अठरा महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहे. सत्ता संघर्षाच्या निकाला लागेपर्यंत निवडणुका लांबल्याचे बोलले जात होते.
आता निकाल लागल्याने पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील, असा अंदाज बांधला जात आहे. त्याच अनुषंगाने मनसेकडून तयारी सुरू झाली आहे. निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी पक्षाच्या राजगड कार्यालयात शुक्रवारी (ता.१२) बैठक बोलविण्यात आली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बैठकीला प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंदे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, म्युनिसिपल काम कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सलीम शेख,
विभाग अध्यक्ष योगेश लभडे, उपजिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, संतोष सहाणे, महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंवर, सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष ज्योती शिंदे, शहराध्यक्ष अर्चना जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
निवडणुकांची रणनीती
१८ ते २० मे या तीन दिवसांच्या कालावधीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः बैठका घेतील. यात नाशिकसह औरंगाबाद, जळगाव व धुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात रणनीती आखली जाणार आहे.
या चारही महापालिका हद्दीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे येथे शासकीय विश्रामगृह येथे तीन दिवस दिवसभर बैठका चालतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.