राज ठाकरेंचा शाखा प्रमुखांना इशारा; म्हणाले, बोलावलं त्यांनीच…

राज ठाकरे
राज ठाकरेSakal
Updated on

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेच्या वतीने गुरुवारी (ता. २३) १२२ शाखा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना पक्षाची शिस्त पाळावी लागेल, घराघरांत पोचून लोकसंग्रह वाढवा हीच पक्षाची ताकद आहे, असा सल्ला दिला.

ज्यांना पक्षाच्या बैठकांना बोलावले जाते त्यांनीच हजर राहावे, अशा कानपिचक्या देताना सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून उथळ राजकारण करणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला. हॉटेल एसएसकेमध्ये मनसेच्या नवनियुक्त शाखाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, शाखाध्यक्षांना पक्षाची शिस्त पाळावीच लागेल. शाखा अध्यक्ष म्हणून नेमणूक मान्य आहे का, असा सवाल प्रत्येकाला करून कुठे येऊन पडलो भविष्यात म्हणू नका असा सल्ला दिला. प्रत्येक शाखाध्यक्षाकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. शाखाध्यक्ष म्हणून काम करताना मनात कुठलेही आढेवेढे ठेवू नका, आपण नवीन आहोत अशी भावना नको, जुने- नवीन असे काही नसते. पक्षात माणसे येतात अन् जातात. शाखाध्यक्ष म्हणून काम करताना लोकसंग्रह वाढविण्याचे काम करावे. प्रबोधनकार ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत केलेल्या कामांची आठवण राज ठाकरे यांनी दिली. नमस्कार करताना हात आखडता घेवू नका, लोकांना आपला माणूस वाटला पाहिजे.

राज ठाकरे
नाशिक मनसेच्या नवनियुक्त शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल

जागोजागी शाखा व झेंडा

पक्षाचा झेंडा ही अस्मिता आहे. त्यामुळे जागोजागी पक्षाचा झेंडा दिसला पाहिजे. प्रत्येक शाखेसाठी जागा असली पाहिजे. मनसेच्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही, तो आपला प्रामाणिकपणा होता. स्पष्टवक्तेपणा व उद्धट बोलणे यातील फरक समजून शाखाध्यक्षांनी वागावे. पक्षाकडून जो आराखडा येईल, त्याप्रमाणेच काम करावे लागेल. शाखाध्यक्षा नंतर गट अध्यक्ष नियुक्त केले जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे
'सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीची थट्टा केली';पाहा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.