नाशिक : दोन महिन्यानंतर राजकारणात सक्रिय झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मनसैनिकांचा मेळावा घेऊन बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाला कसे उभे करायचे याचा सल्ला दिल्यानंतर बालेकिल्ला असलेल्या शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे.
पुणे येथे सभासद नोंदणीचा प्रारंभ गुरुवारी (ता. २५) होणार असून, त्याचबरोबर नाशिकमध्येदेखील दोन लाख सभासदांचे उद्दिष्टपूर्ती करण्याचे आवाहन त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना केले आहे. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यात राज स्वतः नाशिकमध्ये येणार असून, राजदूतांचा बौद्धिक वर्ग घेऊन पक्षाच्या क्षमता मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करणार आहे. (MNS President Raj Thackeray Mission Nashik Latest political news)
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महत्त्व अचानक वाढले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये पक्षाला नवी उभारी देण्याची संधी चालून आल्याने त्या अनुषंगाने राज ठाकरे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा राजकीय मैदानात उतरले आहे.
मंगळवारी (ता. २३) मुंबईत राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी पक्षाच्या क्षमता व ताठ मानेने लोकांसमोर जाण्याचा सल्ला दिला. मनसैनिकांची मानसिक भूमिका भक्कम करताना निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज ठाकरे यांनी पुणे येथून सभासद नोंदणीला प्रारंभ करण्याचा निश्चय केला आहे. त्या अनुषंगाने नाशिकमधून दोन लाख सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
त्यासाठी ऑनलाइन सदस्य नोंदणीची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन सभासद नोंदणी बरोबरच शाळा महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणे, मॉल, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजारपेठ या ठिकाणी सभासद नोंदणी केली जाणार आहे.
राजदूतांची घेणार शिकवणी
एकीकडे सभासद नोंदणी होत असताना दुसरीकडे राज ठाकरे महत्त्वाच्या शहरांना भेटी देणार आहे. सप्टेंबर अखेरीस ते नाशिकमध्ये येणार असून मतदारयादीनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या राजदूतांचा बौद्धिक वर्ग घेणार आहे. जनमाणसांमध्ये मनसेची प्रतिमा उंचावणे व आतापर्यंत पक्षाने घेतलेल्या भूमिका लोकांपर्यंत पोचविण्यासाठी शिकवणी ते घेणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.