Nashik Crime News : एक्स्प्रेसमधून चोरलेला Mobile, Laptop हस्तगत

A police team including Assistant Police Inspector Sachin Bunkar showing the mobile phones and laptops seized from the inn criminals.
A police team including Assistant Police Inspector Sachin Bunkar showing the mobile phones and laptops seized from the inn criminals.esakal
Updated on

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : मुंबई ते हावडा, मुंबई ते उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या मार्गावरील धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या धावत्या रेल्वे मेल, एक्सप्रेस मधून ७ मोबाईल व १ लॅपटॉप इगतपुरी रेल्वे स्थानक दरम्यान चोरी करण्यात आलेला २ लाख १० हजार रुपये किमतीचा एवज इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी सोमवारी (ता.२१ रोजी ) संशयित यांना अटक करत त्यांच्याकडून जप्त केला. (Mobile Laptop stolen from express seized by igatpuri police nashik Latest Crime News)

इगतपुरी रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीत दिवाळीच्या कालावधीमध्ये चालु रेल्वे गाड्यांमध्ये मोबाईल व बॅग चोरीचे गुन्हे घडले होते. याबाबत औरंगाबाद लोहमार्ग पोलिस अधीक्षिका मोक्षदा पाटील यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बनकर, लोहमार्ग औरंगाबाद सायबर सेलच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती प्रेमलता जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांना सूचना व मागर्दशन करून गुन्हे उघड करण्यासाठी सुचित केले होते.

त्यानुसार सायबर सेलकडुन चोरीस गेलेले मोबाईल ट्रेसिंग करून इगतपुरी रेल्वे पोलिस स्टेशनच्या पथकामार्फत कौशल्यपुर्ण तपास करून संशयित आरोपींचा शोध घेऊन अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून ७ मोबाईल व १ लॅपटॉप असा एकुण २ लाख १० हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला. जप्त मुद्देमाल हा तत्काळ फिर्यादी यांना परत करण्यात आला.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

A police team including Assistant Police Inspector Sachin Bunkar showing the mobile phones and laptops seized from the inn criminals.
Nashik ZP : थेटे CEOकडे जाणाऱ्या फाईली आता लेखा, सामान्य प्रशासनद्वारे

सदरची कामगिरी इगतपुरी लोहमार्ग पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बनकर, लोहमार्ग औरंगाबाद सायबर सेलचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल देशमुख, पोलिस हवालदार हेमंत घरटे, गौतम गवारगुरु, धनंजय नाईक, संजीव पारधी, राजेंद्र बोराळे, हारुण शेख, संतोष परदेशी, तुषार मोरे, राजेश बागुल, पोलिस नाईक सुजाता निचड, सविता शिंदे, अमोल निचत, निरज शेंडे, वैभव पाटील, दिनेश चामनार व सायबर सेलच्या पथकातील अंमलदार यांनी केली आहे.

A police team including Assistant Police Inspector Sachin Bunkar showing the mobile phones and laptops seized from the inn criminals.
Nashik Winter Update : ओझरसह परिसर गारठला; पारा 5.7 अंशावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()