नाशिक रोड : जळगाव येथून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे ११ मोबाईल चोरून (Mobile thieves) मुंबईला पळून जाणाऱ्या बाप- लेकाला (Father son) रेल्वे पोलिसांनी (Railway police) ताब्यात घेतले. हे दोघे रेल्वेने प्रवास करीत होते. लोहमार्ग पोलिसांच्या या कामगिरीमुळे कौतुक होत असून, जळगाव शहर पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात या चोरट्यांना देण्यात आले आहे. (Mobile thief father son arrested by police on train Nashik Crime News)
याबाबत माहिती अशी की, नाशिक रोड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष पाटील- उफाडे हे जळगावहून काम आटोपून दादर अमृतसर गाडीने नाशिक रोडकडे येत होते. त्यांना दोन चोरट्यांनी जळगावमधील गुरूकृपा मोबाईल केअर दुकानातून ११ मोबाईल चोरले असून मुंबईकडे प्रवास करीत आहे, असे समजले. त्यांनी ही बाब नाशिक रोड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुभाष कुलकर्णी, गुन्हे शोध पथकाचे हवालदार संतोष पाटील - उफाडे, दीपक निकम, विलास इंगळे, महिला कॉन्स्टेबल अश्विनी प्रधान यांच्या पथकाने मनमाड ते नाशिक रोड दरम्यान चालत्या रेल्वेतच शोध मोहीम राबवली.
कैलास बलराम ललवाणी (४८) व सुमीत कैलास ललवाणी (२३, दोघेही रा. सिंधी कॉलनी, वडोदरा, गुजरात) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे ११ मोबाईल ताब्यात घेतले. तसेच जळगाव गुन्हे शाखेचे हवालदार संजय हिवरकर आणि सहकाऱ्यांना खबर देऊन ते आल्यानंतर दोघा चोरट्यांना त्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. रेल्वे प्रवासातच सतर्कता राखून यशस्वी तपास केल्याबद्दल या पथकाचे रेल्वे पोलिस व नाशिक रोड पोलिस अधिकाऱ्यांना अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.