पंचवटी (नाशिक) : शहरातील बारमाही वर्दळ असलेल्या सीता गुंफा परिसरात बॉम्बस्फोट झाल्याचा दूरध्वनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह पोलिस व अग्निशामक दलाला येतो. अन् काही क्षणातच या यंत्रणांची धावपळ सुरू होते. काही वेळातच संपूर्ण परिसर सील करण्यात येतो. मात्र, थोड्या वेळातच हे मॉकड्रील असल्याचे सिद्ध होते अन् परिसरातील नागरिकांसह बाहेरून आलेल्या भाविकांचा जीव भांड्यात पडतो. (Mock drill by police in Sita cave area nashik)
वेळ सकाळची, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयासह पंचवटी पोलिस, अग्निशामक दल कार्यालयातील दूरध्वनी खणखणतो. पंचवटीतील वर्दळीच्या सीता गुंफेसमोर बॉम्बस्फोट होऊन अनेकजण जखमी झाल्याची माहिती देण्यात येते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या यंत्रणेकडून हा परिसर सील करण्यात येतो. पंचवटीचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने श्री काळाराम मंदिरासह कपालेश्वर महादेव, सीता गुंफा परिसरात बाहेरून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी असते. सुटीच्या दिवशी तर सीता गुंफा परिसरात मोठी गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १९) सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व पोलिसांकडून मॉकड्रील करण्यात आले. मात्र, सुरवातीला नागरिकांना याची काहीही माहिती नसल्याने स्थानिकांसह बाहेरून आलेल्या भाविकांत भीतीचे मोठे वातावरण होते. तपासणी दरम्यान हा संपूर्ण परिसर सील करण्यात आल्याने अफवांना पेव फुटले. मात्र, थोड्याच वेळात हे शासकीय यंत्रणेने केलेले मॉकड्रील असल्याचे समजल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या मोहिमेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, पोलिस यंत्रणेसह महापालिकेचे अग्निशामक दल सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.