Nashik News: धोक्याचा भोंगा वाजला अन...! इंधन कंपनीच्या ‘मॉकड्रील’ची माहिती मिळताच जीव पडला भांड्यात

शेतात विहीर खोदताना इंधन वाहिनीला गळती होत आग लागते आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याचे चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करण्यात आली.
Fuel company employees and officials perform a breathtaking demonstration of a channel fire.
Fuel company employees and officials perform a breathtaking demonstration of a channel fire.esakal """"""""""""""""
Updated on

मनमाड : खादगाव शिवारातून गेलेल्या इंधन वाहिनीला गळती होऊन आग लागते... धोक्याचा भोंगा वाजतो... सर्वत्र धावपळ सुरू होते...अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका ‘सायरन’ वाजवित गावात पोचतात... यंत्रणेची धावपळ सुरू होते.

मग तेल कंपनीच्या वाहिनीला आग लागल्याच्या चर्चेने ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र, ही आग नसून इंधन वाहिनीच्या गळतीनंतर लागणाऱ्या आगीचे कंपन्यांचे संयुक्त ‘मॉकड्रील’ असल्याची माहिती मिळताच, सर्वांचा जीव भांड्यात पडला.

शेतात विहीर खोदताना इंधन वाहिनीला गळती होत आग लागते आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याचे चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. (mockdrill of fuel company at manmad Nashik News)

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल टर्मिनल प्रकल्प, आयओसी गॅस प्लँट, हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्यातर्फे ही प्रात्यक्षिके खादगाव शिवारात झाली.

परिसरातील ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासनापासून कंपनीचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खादगाव शिवारात गुजरातमधून मनमाड-पानेवाडी इंधन कंपन्यांना पाइपलाइनद्वारे इंधन पुरवठा होतो.

खादगाव येथे जमिनीखालून ही पाइपलाइन जाते. त्याच ठिकाणी ही सुरक्षा प्रात्यक्षिके झाली. शेतात जेसीबी मशिनने विहीर खोदकाम करीत असताना इंधन वाहिनीला धक्का लागून ती फुटली.

क्षणार्धात डिझेलचे फवारे सुरु झाले. ग्रामस्थांनी ही माहिती प्रशासनाला कळविली. सर्वच धोक्याचे ‘सायरन’ वाजविण्यात आले.

पाइपलाइन गस्तीपथक साधन-सामुग्रीसह शोध मोहिमेला निघाले. वेगात हे पथक खादगावला पोहोचले. त्या पाठोपाठ कंपनीचे सुरक्षा रक्षक, अग्नीशमन दल आदी खादगावमध्ये दाखल झाले. सर्वत्र धोक्याचा इशारा देण्यात आला.

पाइपलाइनमधून होणारी इंधन वाहतूक तत्काळ थांबविली. पथकाने घटनास्थळी येऊन ‘लिकेज’ पाइप बंद केली. नंतर सर्वत्र पसरलेले डिझेल संकलित केले. पण, हे करीत असताना इंधन पाइपलाइनमधून भडका उडाला.

Fuel company employees and officials perform a breathtaking demonstration of a channel fire.
Nashik News : नाशिक रोडच्या नावलौकीकाला बाधा

आगीचे लोळ उठू लागले. सुरक्षा रक्षकांनी चारही बाजूंनी सुरवातीला फोमची फवारणी केली. मग पाण्याचे फवारे चारही बाजूने सोडण्यात आले. वीस मिनिटांत इंधनाची गळती बंद होऊन आगही नियंत्रणात आली.

अॅल्युमिनियम कोट परिधान केलेल्या जवानाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ‘सब कुछ ओके’ असल्याचा ‘सिग्नल’ दिला. बावीस मिनिटे श्‍वास रोखून धरणारी चित्तथरारक आणि जीवघेणी प्रात्यक्षिके संपुष्टात आली.

जिल्हा प्रशासनाचे अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, औद्योगिक सुरक्षा संचालक प्रवीण पाटील, नागापूरचे सरपंच राजेंद्र पवार, आनंद बर्मन, डॉ. सुशांत तुसे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात, कंपनी अधिकारी धीरजकुमार, माजी सभापती प्रकाश घुगे, गटविकास अधिकारी संदीप दळवी, विस्तार अधिकारी व्ही. के. ढवळे, खादगावच्या सरपंच संगीता वडक्ते, अनिल मेश्राम, विशाल सोनवणे, एस. डी. पवार, रोशन तिवलेकर आदी उपस्थित होते. परिचालन अधिकारी अंकित कुल्हारी यांनी संचलन केले. प्रवीण पाटील व श्री. देशपांडे, सरपंच पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.

Fuel company employees and officials perform a breathtaking demonstration of a channel fire.
New Year 2024 : सरत्‍या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्‍ज; हॉटेल व्‍यवस्‍थापनाकडून जय्यत तयारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.