Water Purification : गढूळ पाण्यापासून नांदगावकरांना दिलासा; शुद्धीकरण प्रक्रियेत बदल

Two tanks in the new improvement for alum and pre-chlorination in the water treatment scheme.
Two tanks in the new improvement for alum and pre-chlorination in the water treatment scheme. esakal
Updated on

Nashik News : नगरपरिषद तर्फे शहराला होणाऱ्या गढूळ व वास येणाऱ्या पाण्यापासून मुक्ती मिळू लागली आहे. जलशुद्धीकरण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव नगरपरिषदतर्फे शुद्धीकरण प्रक्रियेत बदल करण्यात आल्याने पिण्याच्या पाण्यात सुधारणा होत असल्याचा दावा नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Modification of water purification process under guidance of water purification experts in nandgaon nashik news)

एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी पावसामुळे दहेगाव धरणातले पाणी ढवळून निघाल्याने पाण्यात मोठ्या प्रमाणावर कचरा व मातीचे प्रमाण वाढले होते. धरणातल्या पाण वनस्पतींचे विघटन होऊन पाण्याला रंग व वास येऊ लागल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे नागरिकांनी केल्या.

मात्र शुद्धीकरण यंत्रणेतील त्रुटीमुळे प्रशासन नागरिकांचे समाधान करण्यास असमर्थ ठरले होते. तसेच ठिकठिकाणी पाइपलाइन फुटल्याने पाण्यात मिसळणारी माती, घाण यामुळे नांदगावकराना गढूळ आणि वास युक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरुच होता.

यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातले निवृत्त अधिकारी प्र.भा. पाथ्रीकर यांना नगरपरिषदतर्फे या समस्येवर उपाय शोधण्यासाठी बोलविण्यात आले होते. त्यांनी थेट धरणातून येणाऱ्या प्रक्रिया पूर्व पाण्यावर तुरटी व प्री क्लोरिनेशनची मात्रा देण्यासाठी दोन नवीन टाक्या प्रस्तावित केल्या होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Two tanks in the new improvement for alum and pre-chlorination in the water treatment scheme.
NMC Election : ठाकरे सेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर; निवडणुकीसाठी कंबर कसली

तसेच स्थायीकरण टाकीतून साठवण टाकीकडे जाणाऱ्या पाण्यावर पोस्ट क्लोरिनेशन परिणाम कारकरित्या राबविण्याची पद्धत श्री.पाथ्रीकर यांनी सुचविली होती. त्याअन्वये मात्रा व वेळा यात नगरपरिषदेने बदल करत असून नळातून येणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवेच्या जिल्हा प्रयोग शाळेकडे गेल्या चार पाच महिन्यात पाठवलेले नमुने पिण्यास योग्य आहेत असा निष्कर्ष कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्या सहीने परिषदेस प्राप्त झाले असल्याने नागरिकांमध्ये या अहवालाचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

पाण्याचा गढूळपणा दर्शविणारे नमुने नागरिकांनी बाटल्यांमध्ये भरून सोशल मिडीयात व्हायरल केले आहेत. शासकीय प्रयोगशाळेत केवळ सूक्ष्मजीव तपासणी होत असेल आणि स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असेल तर त्यांचेकडे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. श्री. पाथ्रीकर यांच्या भेटीत ‘क’ वर्ग नगरपरिषदेच्या मर्यादा उघड झालेल्या असल्या तरी शासकीय प्रयोगशाळेची जबाबदारी सूक्ष्मजीव तपासणी पलीकडे अधिक व्यापक असणे ही गरज आहे.

Two tanks in the new improvement for alum and pre-chlorination in the water treatment scheme.
Raj Thackeray : शहर दत्तक घेतले, त्याचे काय झाले? राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()