Nashik Crime News : 'तो' नराधाम विद्यार्थ्यांकडून करवून घेत होता वेठबिगारी!

Child Labour
Child Labouresakal
Updated on

पंचवटी : शिक्षणाच्या नावाखाली आणलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा 'तो' नराधम वस्तीगृहातील बालकांकडून द्रोण बनविण्याचे काम करवून घेत असल्याची आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आता या संशयितावर वेठबिगारीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंचवटी परिसरातील द किंग फाऊंडेशन संचलित ज्ञानपीठ गुरुकुल वसतिगृहात माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य समोर आले आहे. याप्रकरणी तपासी यंत्रणांकडून युद्धपातळीवर चौकशी सुरू झाली आहे.

यात आणखी पाच मुली नराधमाच्या अत्याचाराला बळी पडल्याचे समोर आल्याने या प्रकाराला वेगळे वळण लागले असून, संशयितावर आणखी पाच गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र याही पुढे जाऊन आणखी एक माहिती समोर आली आहे. (Molests minor students brought in the name of education student makes drones out of slum children Crime Register Against Child Labour Act Nashik News)

Child Labour
Nashik Crime: आई-बाप ठरले नकोशीचे वैरी; नवजात मुलीला सोडलं कुत्र्यांच्या तावडीत अन्...

हे कृत्य करणारा संशयित हर्षल उर्फ सोनू मोरे याने मागील वर्षी द्रोण बनविण्याचे मशीन घेतले होते. हे मशीन त्याने जत्रा हॉटेल वृंदावन नगर येथील प्रगती सोसायटीतील रो हाऊस टाईप घरात ठेवले होते. वसतिगृहातील मुले शाळेतून दुपारी आले की, जेवण करून त्यांना या ठिकाणी पाठवले जात असे. त्यांच्याकडून द्रोण तयार करून घेत पंचवटीतील काही स्वीटचे दुकान व द्रोण विक्रेते व्यावसायिक यांच्याकडे विकण्यासही पाठवत होता.

यासाठी घाम गाळणाऱ्या मुलांना सांगत असे की, या व्यवसायातून आलेला पैसा हा आपल्या संस्थेच्या कामी लागतो. आपल्याला आधार देणाऱ्या संस्थेसाठी आपण केलेले काम फार मोलाचे आहे, या भाबड्या आशेने ही मुले जोमाने काम करत असत. दुसरीकडे नराधम संशयित या मुलांच्या असहायतेचा फायदा घेत आपली काळी कृत्ये करीत होता. परंतु, नियतीने अखेर त्याची ही सारी कृत्ये जगासमोर आणली. आता अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर बाल कामगार कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

Child Labour
Champa Shashti : खंडेराव टेकडीवर गुंजला ‘जय मल्हार’चा गजर

एका मुलाला गंभीर इजा

विशेष म्हणजे या द्रोण मशीनवर काम करताना एका अल्पवयीन मुलाचा बोट तुटला होता, त्यानंतर संबंधित मुलाने थेट आपले गाव गाठले. पुन्हा या वस्तीगृहाचे तोंडही पाहिले नाही, अशी माहिती काही सूत्रांकडून मिळाली आहे.

"काय सांगतो बाल कामगार कायदा"

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० "बाल' किंवा "मूल' याचा अर्थ ज्यास वयाची १८ वर्ष पूर्ण झालेली नाहीत, अशी व्यक्ती. बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा १९८६ वय वर्ष १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, असे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे. नियमभंग करणाऱ्यांना ३ महिन्यांपासून १ वर्षापर्यंत तुरुंगवास व त्यासोबत दहा ते वीस हजार दंड होऊ शकतो. उद्योगांमध्ये किंवा व्यावसायिक संस्थांमध्ये बालकामगारांकडून काम करून घेतले जात असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) स्थापन केलेला आहे.

"संशयित आरोपीच्या माने नगर मधील निवासी वसतिगृहाच्या गेटवर द्रोण, पत्रावळी विक्रीचा फलक लावलेला आहे.परतू मशीन हे वृंदावन नगर येथील रो हाऊस मध्ये होते आणि द्रोण बनविण्याचे कामकाज देखील या ठिकाणी चालत असे. नारायण निवासी वसतिगृहाच्या गेटवरील फलकांवर लक्ष्मण चौरे आणि प्रकाश गायकवाड अशी पुसटशी नांव व नंबर दिसत आहे.या गोष्टीकडे देखील पोलीसांकडून दुर्लक्ष झाले असावे. चौरे आणि गायकवाड यांचा हर्षल मोरेशी काही संबंध आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे."

Child Labour
Agniveer Recruitment : पाडळीतील 8 तरुण सैन्य दलात भरती; गावातील तरुण पहिल्यांदाच सीमेवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.