Nashik News : पक्षी संवर्धनासाठी ‘मॉनिटरिंग कमिटी'

Nashik: A meeting was held by Nature Club of Nashik and Bird Nisarga Mitra Mandal on Friday at Nandur Madhmeshwar Bird Sanctuary
Nashik: A meeting was held by Nature Club of Nashik and Bird Nisarga Mitra Mandal on Friday at Nandur Madhmeshwar Bird Sanctuaryesakal
Updated on

नाशिक : नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात विकास कामे करण्यासाठी ‘मॉनिटरिंग कमिटी' वन विभागातर्फे स्थापन करण्यात येईल.

सात सदस्यांच्या समितीत वन परीक्षेत्र अधिकारी, पक्षी अभ्यासक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती, चापडगावचे सरपंच आणि उपवनसंरक्षक यांचा समावेश राहील, अशी माहिती उपवनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली.

स्थलांतरित चक्रवाक पक्ष्याच्या मृत्यूनंतर पक्षीमित्रांनी नाराजी व्यक्त केली होती. अभयारण्यातील कामासंबंधी पक्षीमित्र नाराज होते. त्याचअनुषंगाने अभयारण्यातील चापडगाव गेट येथे नेचर क्लब ऑफ नाशिक, पक्षी निसर्ग मित्र मंडळातर्फे वन विभागाचे अधिकारी, पक्षीमित्र, स्थानिक ग्रामस्थांची बैठक झाली. (Monitoring Committee for Bird Conservation initiatives of Forest Department implement employment of guides In Forest Development Scheme through Rotation Nashik News)

Nashik: A meeting was held by Nature Club of Nashik and Bird Nisarga Mitra Mandal on Friday at Nandur Madhmeshwar Bird Sanctuary
Jalgaon News : गोद्रीची पाणी, रस्ते, आरोग्याची समस्या सुटली

ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ताकाका उगावकर अध्यक्षस्थानी होते. बैठकीमध्ये वन विभागाचे नाशिकमधील कार्यालयाचे अभयारण्यात स्थलांतर, रेस्क्यू सेंटर, पक्षीगणना, नेचर ट्रेल, संरक्षक पथक, गौण खनिज, मासेमारी क्षेत्र आदी विषयांवर चर्चा झाली. पक्षीमित्रांचे म्हणणे ऐकल्यावर श्री. रणदिवे म्हणाले, की पक्षीगणना वर्षभर करण्यात येईल.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पक्षीगणना होईल. तत्पर्वी पक्षी गणना कशी करावी यासाठी कार्यशाळा होईल. स्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यास करण्यासाठी बंद पडलेला ‘नेचर ट्रेल' पुन्हा सुरु करण्यात येईल.

जून्या गाइडना रोजगार मिळणार असून नवीन गाइडची भरती केली जाईल. त्यासाठी स्थानिक तरुणांना संधी दिली जाईल.'रोटेशन' पद्धतीने गाइडला रोजगार मिळेल. अभयारण्यात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येईल.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Nashik: A meeting was held by Nature Club of Nashik and Bird Nisarga Mitra Mandal on Friday at Nandur Madhmeshwar Bird Sanctuary
Nashik News : निधी खर्चासाठी ZPत धावपळ; तालुकानिहाय पंचायत समित्यांमध्ये बैठकांचा सपाटा

पानवेली काढण्यासाठी मदत

गावातील जन-जल-जंगल-जमीन या विकास योजनेचे उद्दिष्ट सांगून श्री. रणदिवे म्हणाले, की अभयारण्य धरणातील पानवेली काढण्यासाठी नाशिक महापालिकेची मदत घेतली जाईल. त्यासाठी महापालिकेला पत्र दिले आहे. जखमी पक्ष्यांसाठी खानगाव थडी गावात बांधलेले वन विभागाचे सेंटर पुन्हा सुरु करून तेथे पशू वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक होण्यासाठी काम सुरु आहे. मात्र अभयारण्याची हद्द सोडून मासेमारी करायला हवी.

पाणथळस्थळी अभयारण्याचे सूचना फलक लावले जातील. संरक्षक पथकाला ‘ड्रेस कोड' आणि ‘पेट्रोलिंग' वाहन दिले जाईल, असेही श्री. रणदिवे यांनी स्पष्ट केले. अनेक शेतकऱ्यांनी पक्षी आमच्या शेतात येवून धान्य खावून मोठे नुकसान करत असल्याने आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.

चापडगावचे सरपंच बबन बोडके यांनी खासगी शेतीमधील माती काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मासेमारी करणारे वीस जण उपस्थित होते. त्यांनी आम्हाला एक क्षेत्र मासेमारी करण्यासाठी द्यावे, अशी मागणी केली.

Nashik: A meeting was held by Nature Club of Nashik and Bird Nisarga Mitra Mandal on Friday at Nandur Madhmeshwar Bird Sanctuary
Nashik News : निधी खर्चासाठी ZPत धावपळ; तालुकानिहाय पंचायत समित्यांमध्ये बैठकांचा सपाटा

पक्षीमित्रांच्या प्रश्नांचे वाचन डॉ. उत्तम डेर्ले व किशोर वडनेरे यांनी केले. जेष्ठ पक्षीमित्र सतीश गोगटे, अनिल माळी, अनंत सरोदे, अमोल दराडे, डॉ. जयंत फुलकर, सीमा तंगडपल्लीवार, डॉ. श्रीराम उपाध्ये, मधुकर दराडे, किरणकुमार बेलेकर, गणेश वाघ, भीमराव राजोळे,राहुल वडघुले, रवींद्र वामनाचार्य, संतोष देशमुख, मिलींद देशमुख, ज्योतीताई पाटील, रुपाली जोशी, हितेश पटेल, नुरी मर्चंट, पुरुषोत्तम आव्हाड, प्रमोद दराडे, गंगाधर आघाव, रोषण पोटे, पंकज चव्हाण, विकास गारे आदी उपस्थित होते.

Nashik: A meeting was held by Nature Club of Nashik and Bird Nisarga Mitra Mandal on Friday at Nandur Madhmeshwar Bird Sanctuary
Nashik News: वीजनिर्मितीत MVP होणार स्‍वयंपूर्ण; Solar Park किंवा शाखानिहाय सौरऊर्जा प्रकल्‍पाची चाचपणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.