Sowing crisis due to monsoon delay
Sowing crisis due to monsoon delayesakal

Monsoon Delay: पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात! उसासह अनेक पिके करपू लागली

Published on

विकास गिते

Monsoon Delay : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्गाला पाऊस लांबल्याने खरीप हंगामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पाण्यावाचून ऊस व फळबागा किती काळ तग धरणार, हा प्रश्न निर्माण होत आहे.

नदीपात्रात खड्डे घेऊन शेतीसाठी पाणी मिळवण्याची धडपड चालू असून अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी हळूहळू आटत राहिले आहे. अनेक गावातील विहिरीनाही तळ गाठलेला आहे. (Monsoon Delay Kharif season in danger due to lack of rain nashik news)

यंदाच्या पर्जन्यमानाचे संदर्भात वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असतानाच मान्सूनच्या आगमानास उशीर झाला आहे. सलग दोन वर्षे समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहीर बागायत क्षेत्रात उसाच्या क्षेत्रात झालेली वाढ होती.

यावर्षी वरुणराजाच्या आगमनास उशीर होत असून यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत घट होते आहे. अनेक बोअरवेल बंद पडले आहेत.

यामुळे बहुवार्षिक पिकांबरोबर उन्हाळी हंगामातील पिकेही अडचणीत सापडली आहेत. जिल्ह्यातील अनेक धरणात पाणीसाठा हा कमी झालेला असून. यामुळे बहतेक ठिकाणी उसाचे पीक पाण्याअभावी अडचणीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

. यंदा पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने खरीप हंगामाबाबत पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. . परिणाम म्हणून खरिपाच्या पेरणीस उशीर होणार आहे.

यामुळे खरीप हंगामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यंदाच्या हंगामात हवामान विभागाने सरासरीच्या ९६ टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sowing crisis due to monsoon delay
Monsoon Delay: मॉन्सूनचा प्रवास पुढे सरकेना..! बिजोरसे परिसरात पावसाच्या प्रतीक्षेने पेरण्या रखडल्या

हवामान विभागाने यंदा १९६ टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज व्यक्त केला होता, शिवाय अनेक हवामान तज्ज्ञांनीही यंदा समाधानकारक पाऊस पडेल असे सांगितले होते, मात्र सर्वांचेच अंदाच चुकल्याचे जाणवत आहे. यामुळे शेतीवर मोठा परिणाम होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

भरोसेमंद वाटणारे हवामान तज्ज्ञ , अद्यापही समाधानकारक पाऊस होईल, असे पावसाचा पत्ता नसल्याने सांगत असले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. मध्यंतरीच्या काळात दुधाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरीवर्गानि दुग्धव्यवसाय वाढविला आहे.

जनावरांची संख्या वाढल्याने आता नजीकच्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच पावसाळा सुरू होण्यास होत असलेला उशीर ग्रामीण अर्थकारणावर परिणाम करणारा ठरू झाला आहे.

कांद्याला हमीभाव नसल्यामुळे चाळीत साठवलेला कांदा हळूहळू सडू लागल्याने अत्यंत कमी भावात विकण्याची वेळ बळीराजावर आली असून साठवलेल्या कांद्याला भाव नसल्याने बळीराजा व त्यांचे कुटुंबे हतबल झालेले आहेत.

जूनचा महिना संपत आला तरी एक टिपूसभर थेंब जमिनीवर अजून पडलेले नसल्याने. पुढील पिकांची साशंकता व्यक्त केली जात आहे.

Sowing crisis due to monsoon delay
Water Crisis : ठाणे जिल्ह्यात पाणी संकट कायम; बारवी धरणात 27 टक्के पाणीसाठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.