Monsoon Health Tips : मॉन्सूनचे आगमन झाले असले, तरीही एका दिवसांत बदलत्या हवामानाची प्रचिती येत आहे. अशा काळात सदृढ आरोग्यासाठी दुधातून राजगिरा, खोबऱ्याचे पदार्थ, तांदूळ अथवा ज्वारीची खीर खायला हवी.
एवढेच नव्हे, तर थंड पाणी पिण्याचे टाळावे. तसेच, जेवणामध्ये आल्याचं लोणचं, आल्याचा रस, आल्याचा कीस अथवा मुरंबा हमखास वापरावा, असा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञांनी दिला आहे. (Monsoon Health Tips Get energy by eating amaranth and coconut foods from milk Avoid cold water nashik)
गेल्या बारा दिवसांपासून अंगदुःखीचे रुग्ण वाढत आहेत. दिवसातून तीनदा बदलत असलेल्या हवामानामुळे पंख्याचा वापर केला जात आहे. हे कारण अंगदुःखीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे डॉक्टरांना आढळून आले आहे.
पावसात सातत्य नसले, तरीही प्रत्येकाने वर्षा ऋतुचर्याचे पालन करायला हवे, असे सांगून वैद्य विक्रांत जाधव म्हणाले, की सध्याच्या वातावरणात भाजलेले अन्नपदार्थ खायला हवेत. जड पदार्थ टाळावेत. उपवासासाठी राजगिरा, रताळी, रताळ्यांचा कीस असे ऊर्जा देणारे पदार्थ खावेत.
हरभरा डाळीचे तळलेले पदार्थ आता आहारात टाळणे आवश्यक आहे. पावाचा समावेश असलेले पदार्थ भाजून खावेत. बेकरीचे पदार्थ मात्र टाळावेत. मांसाहार करु इच्छिणाऱ्यांनी भाजलेले पदार्थ खावेत.
ताजी अंडी खाण्यासाठी वापरावीत. त्यामध्ये दालचिनी, वेलची, सूंठ, जायफळ अशा मसाल्याच्या पदार्थांचा वापर करावा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, जेवणामध्ये गरम पाण्याचा वापर करावा.
झोपताना गरम पाणी प्यावे. लहान मुलांसाठी आल्याचा पाक उपयुक्त ठरतो. मात्र, गोड पदार्थ त्रासदायक ठरत असल्याने आहारात त्यांचा उपयोग टाळणे आवश्यक असल्याचेही श्री. जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सूंठ, दालचिनी वाढवते भूक
चहा-दूधामध्ये सूंठ, दालचिनीचा वापर करावा. त्यामुळे भूक वाढण्यासाठी मदत होते. पोट व्यवस्थित राहते. कफ, वाताचे विकारांना प्रतिबंध होतो, असे सांगून वात न बाधण्यासाठी काय करावे याची माहिती दिली.
सांध्यांना तीळाचे तेल लावून स्नान केल्यास वात बाधणार नाही, असेही त्यांनी सांगितले. नाश्त्यामध्ये भाजलेले पदार्थ असावेत, असे आग्रहाने सांगत असताना त्यांनी पोहे, बेकरीचे पदार्थ, फरसाण असे पदार्थ टाळावेत असे स्पष्ट केले.
तुळशीची पाने भिजवलेले पाणी प्यावे
तुळशीची पाने भिजत घालून ते पाणी दिवसभर पिण्यासाठी वापरावे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. श्वसनाच्या प्रक्रियेमध्ये मदत होते. असे विविध फायदे एका कृतीने होऊ शकते, असेही श्री. जाधव यांनी सांगितले.
"ऋतुंचा विचार करून आपल्या आहार-विहारामध्ये बदल केला जातो. अशांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मदत होते."- वैद्य विक्रांत जाधव, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.