Monsoon Delay: मॉन्सूनचा प्रवास पुढे सरकेना..! बिजोरसे परिसरात पावसाच्या प्रतीक्षेने पेरण्या रखडल्या

Cultivation of agriculture done by farmers before sowing
Cultivation of agriculture done by farmers before sowingesakal
Updated on

Monsoon Delay : पावसाचे रोहिणी नक्षत्र कोरडे गेले, मृग नक्षत्र संपत आले तरी पावसाची काहीच चिन्हे व संकेत दिसत नसल्याने ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, भूईमूग, मूग आदी पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. काटवन व बिजोरसे परिसरात बळिराजा चिंतेत आहे. (Monsoon journey delayed Sowing stopped in Bijorse area waiting for rain nashik news)

शेतकरी खरिपाची तयारी झाल्याने आता पावसाची वाट बघत आहे. पाऊस नसल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम पाहायला मिळत आहे.

कीटकनाशके, बी-बियाणे, खते आदींच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी दिसत नाही, त्यामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट दिसून येत आहे.

वातावरणात उष्मा वाढलेला असल्याने शेतीच्या कामावर प्रतिकूल परिणाम दिसत आहे. बऱ्याच भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाऊस लवकर आला नाही तर शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन बिघडणार असल्याची स्थिती आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Cultivation of agriculture done by farmers before sowing
SAKAL Impact : निमोण येथील ट्रान्स्फॉर्मर महावितरणने बदलला

बळिराजा पेरणीपूर्व मशागतीची नांगरणी वखरणी आदी कामे आटपून आकाशाकडे नजर लावून बसला आहे. चारा टंचाई असल्याने जनावरांचेही येत्या काळात हाल होणार आहे.

शेतकरी हवालदील झाला आहे, ७५ मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पावसाअभावी शेत शिवारातील चैतन्य हरवले आहे. बळिराजा चातक पक्षासारखी पावसाची वाट पाहत आहे.

Cultivation of agriculture done by farmers before sowing
Nashik News: माकडडोह तलावनिर्मितीस हिरवा कंदील! शेतीला होणार लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.