Nashik Water Crisis : जिल्ह्यात विशेषतः जिल्ह्यातील पूर्व भागातील अनेक गावांत पावसाने अजूनही पाठ फिरवली आहे. त्यामुळे पीकपाणी परिस्थिती गंभीर झाली आहे. काही ठिकाणी अजूनही ढेकळेदेखील फुटलेले नाहीत.
जिल्ह्यातील बहुतेक पाणी प्रकल्प तळाला गेले असून, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ६७ गावे व ३७ वाड्यांना ऐनपावसाळ्यात ट्रॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. (monsoon rain decrease in eastern part of district Water supply to palaces during rainy season by tranker nashik)
५८ ट्रॅंकरद्वारे या गावांना १२१ फेऱ्या करीत आहेत. पावसाळ्यातही टँकर सुरू ठेवून प्रशासन पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात एकीकडे प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू आहे, तर जिल्ह्यातील चांदवड, मालेगाव, देवळा, नांदगाव, येवला, सिन्नर, कळवण, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊस पडला नाही तर
टंचाईची परिस्थिती पुढच्या काही दिवसांत आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे.
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पुन्हा दुष्काळाचे सावट जनतेला सतावू लागले आहे. पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पीकपाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी अजूनही पेरणी झाली नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्ह्यात सद्यःस्थितीला ५८ टँकर सुरू असून, या टँकरच्या माध्यमातून १२१ टँकरच्या फेऱ्या करून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भरपावसाळ्यात चक्क टँकर सुरू आहेत.
यावरून पाणीटंचाई परिस्थिती गंभीर असेल, याची जाणीव होते. जुलै महिन्याची १९ तारीख उलटून गेली तरी जिल्ह्यातील धरणात पाणी साठेल असा पाऊस झाला नाही. आता जिल्ह्यातील टंचाई दूर होण्यासाठी मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
सध्या जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठासुद्धा आठ ते पंधरा दिवसांनी सुरू आहे, तर काही पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. अनेक गावांतील नागरिक विकत पाणी घेऊन आपली व जनावरांची तहान भागवीत आहेत.
आता सर्वच ग्रामस्थांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. ‘आता तरी देवा मला पावशील का, गावाला आमच्या पाऊस पाडशील का...’ अशीच आर्त हाक दिली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.