Snake Bite Precaution : आला पावसाळा.... सर्पदंशापासून करा बचाव...! अशी घ्या काळजी...

Snake Bite Precaution
Snake Bite Precaution esakal
Updated on

Snake Bite Precaution : पावसाळा चालू झाला की मानवी वास्तव्याच्या परिसरात साप आढळण्याचे प्रमाण वाढते. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो.

त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पावसाचे, नदी नाल्यांचे पाणी साचते. त्यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात सर्प जून ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात.

सापाबद्दल असलेल्या गैरसमजातून त्यांना मारण्याचे प्रकार घडतात किंवा सर्पदंश झालेल्या व्यक्ती देखील घाबरून मृत्यूमुखी पडतात. (monsoon season snake bite precautions nashik news)

नाशिक जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास गेल्या वर्षी मानवी सर्पदंशाच्या ५५०५ घटना घडल्या होत्या. त्यामध्ये ५० जणांना प्राण गमवावे लागले होते. यंदाच्या पावसाळ्यात आरोग्य विभागामार्फत जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सर्पदंश प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आली आहे.

सरासरी १५ ते २५ लसीचा प्रत्येक आरोग्य केंद्रात साठा करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेले माहितीनुसार १५ तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील लसीचा आकडा ३८१३ इतका असून जिल्हास्तरावर अतिरिक्त ४०० लस सज्ज ठेवण्यात आली आहे. नाशिकच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या अतिपाऊस पडणाऱ्या भागात पावसाळ्यात सर्पदंश होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

सर्पदंश झाल्यास काय करू नये

विष तोंडाने ओढून काढू नका. सर्पदंशाच्या जागी चिरा घेऊ नका. सर्पदंशाची वरील/खालील बाजू कशानेही बांधू नका.

वैदू, बुवा, बाबा यांच्याकडे जाऊ नका. साप शोधण्यात, मारण्यात वेळ वाया घालवू नका. सर्पमित्राची मदत घ्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Snake Bite Precaution
Poisonous Snakes: जगातील पाच भयानक साप! एका दंशात संपेल खेळ

सर्पदंश झाल्यास काय करावे

शांत रहा आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. रुग्णाला मानसिक आधार द्या. कोणत्या प्रकारचा साप चावला या कडे लक्ष द्या.

हाताला किंवा पायाला सूज आली तर अडचण येऊ नये म्हणून बांगड्या, अंगठी, घड्याळ

रुग्णाला हालचाल करू देऊ नका. गरज असेल तरच त्याला चालू द्या.

न्युरॉटोक्सिक विष असणारा साप (नाग) चावला असेल तर चावलेला भाग स्प्लिंट बांधून स्थिर करावा.

विनाविलंब रुग्णालय गाठा.

सर्पदंशाची नेमकी वेळ लक्षात ठेवा आणि रुग्णाच्या लक्षणांकडे लक्ष ठेवा. डॉक्टरांना नेमकी माहिती द्या.

Snake Bite Precaution
Medical Precautions: "इथून पुढे डॉक्टरांनी 'Rx' नाही तर 'श्री हरी' लिहायचं"

सर्पदंश टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी

रात्री फिरताना बॅटरी घेऊन फिरावे. अंधारात चालण्याचा प्रसंग आल्यास पाय किंवा काठी आपटत चालावे त्यामुळे जमिनीत कंप निर्माण होऊन साप दूर निघून जाईल. साप दिसताच त्याला निष्कारण मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी साप स्वतःचा बचाव करण्यासाठी चावण्याची शक्यता अधिक असते.

घराच्या जवळपास केरकचरा, विटा किंवा कौले रचून ठेवू नयेत. अशा ठिकाणी साप आसरा घेतात. घराजवळ झाडे असतील व त्यांच्या फांद्या घरावर आलेल्या असतील तर झाडावरून साप घरात येण्याची शक्यता असते. घराशेजारी लाकूड किंवा गवत अशा वस्तूंचा साठा करू नये. केल्यास या वस्तू काढताना काळजीपूर्वक काढाव्यात.

झोपताना कॉट किंवा पलंग यांवर झोपावे, भिंतीच्या कडेला झोपू नये. मांजर व कुत्री हे घराभोवतालच्या सापाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. मांजर अंधारातदेखील सापाला ओळखू शकते. कुत्री वासावरून सापाचे अस्तित्व ओळखतात.जंगलात फिरताना डोक्यावर टोपी घालावी व पायात बूट घालावेत. सर्पमित्रांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून ठेवावेत.

संदर्भ सेवा : सर्पदंश झालेल्या रुग्णाला उपचाराकरिता संदर्भीत करणे गरजेचे असल्यास १०२ व १०८ रुग्णवाहिकांचा वापर करणेबाबत जिल्हा स्तरावरून सूचित करण्यात आले आहे.

Snake Bite Precaution
Snake Bite : राग आला, भावानं साप सोलून खाल्ला! Video पाहून झोप उडेल

तालुकानिहाय उपलब्ध असलेला लसिंचा साठा ...

चांदवड १४४, देवळा ३५६, दिंडोरी ४६४, इगतपुरी १६९, कळवण ४२५, मालेगाव १७९, नांदगाव १२९, नाशिक तालुका ५३२, निफाड १९४, पेठ १९३, सटाणा १९४, सिन्नर ४१४, सुरगाणा १७९, त्रंबकेश्वर १३४, येवला १०७.

आरोग्य केंद्रातील तयारी

सर्पदंश झालेल्या रुग्णांसाठी एएमबीएचयु बॅग, लॅरिग्नोस्कोप ही साधने, एड्रेनालाईन, हाइड्रोकोर्ट, एट्रोपिन, नियोस्टिग्माइन ही इंजेक्शन उपलब्ध ठेवली जाणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन सिलिंडर भरून ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.

"सर्पदंश झालेले व्यक्तीला धीर देऊन सर्वात अगोदर जवळच्या कोणत्याही सरकारी रुग्णालयापर्यंत आणावे. सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण भागात शेतामध्ये काम करत असताना घडतात.

शेतकऱ्यांनी सर्वतोपरी काळजी घेऊनच शेतात जावे. पायात गम बूट असावेत, तसेच अंगावर पूर्ण कपडे असल्यास दंशाची तीव्रता कमी असते. सर्पदंश हा अपघात असून घाबरून जाऊ नका. आपल्याकडे केवळ तीन ते चार जातीचे साप विषारी आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे." - डॉ. राजेंद्र बागूल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक

Snake Bite Precaution
Snake Bite : साप चावला बायकोला, अन्‌ विष चढले नवऱ्याला; ‘तो’ म्हणतो मला नाहीच झाला सर्पदंश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.