निसर्गाला बघण्याची, त्यातील घटकांची ओळख करण्याची व अभ्यास सुरू करण्याची हीच खरी वेळ आहे. निसर्गाचा अभ्यास पावसाळ्याच्या मध्यापासून तर पुढील वर्षाच्या पावसाळ्याच्या मध्यापर्यंत केल्यास वेगवेगळ्या ऋतूत काय जडणघडण करतो हे लक्षात येते.
पावसाळ्याच्या मध्यात सर्व झाडे हिरवीगार झालेली असतात. विविध प्रकारचे गवत उगवलेले असते. विविध कीटकांची रेलचेल असते. विविध प्रकारच्या पक्ष्यांचे कवळ गवत गोळा करून घर बनविण्याची लगबग किंवा काही पक्ष्यांची पिल्लांना भरविण्यासाठी घरट्याकडे फेऱ्या याच दिवसात सुरू असतात.
वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या कलाकुसरीने घरटे बनवत असतात. पान तजेलदार झालेली असतात. पानांची रचना लक्षात येते व त्यावरुन वृक्षांची ओळख होते.
-शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था
(Monsoon season to start studying elements of nature nashik)
काही वृक्षांना फूल आलेली असतात, तर काहींना नुकतेच फळधारणा सुरू झाली असते. प्रत्येक ऋतूंत वेगवेगळ्या वृक्षांना फूल व फळधारणा असते.
ऋतूचक्रानुसार कुठल्या ऋतूमध्ये झाड संपूर्ण कसे दिसते, कधी त्याची पान रंग बदलून गळून पडायला लागतात, कुठल्या ऋतूमध्ये किती काळ तो बोडका राहतो किंवा काही झाड सदाहरित राहतात, हे आपल्याला या वर्षभराच्या निरीक्षणामध्ये कळते.
हिवाळ्यात व शेवटास काही वृक्षांची पानगळ होते व काही वृक्षांच्या पानगळीला सुरवात होते. पानगळीनंतर बरेच वृक्ष वेलींना फुलांचा हंगाम सुरू होतो.
जणू काही कोण किती सुंदर, निसर्गामध्ये रंगाची उधळण करतो, अशी त्यांच्यामध्ये स्पर्धाच लागलेली असते. कुठल्या झाडाच्या फुलांवर व फळ खाण्यासाठी कुठल्या प्रकारचे पक्षी येतात.
फूल व फळ धारणेवरून वृक्षांची नवीन ओळख होते. हा जो फुलोरा आणि फळ येण्याचा कालावधी आहे, साधारण तो जूनपर्यंत बऱ्याचशा झाडांना या काळामध्ये फुलांनी व फळांनी बहरलेला व रंगांची उधळण बघण्यास खरा आनंद मिळतो.
या दिवसात म्हणजे हिवाळ्याच्या शेवटी फुलणाऱ्या झाडांविषयी पळस, काटेसावर, पांगारा या झाडांवर मध खाण्यासाठी पक्ष्यांची लगबग बघण्यात, वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी पक्षी आपल्याला दिसून येतात. त्यांचा किलबिलाट ऐकण्यात एक वेगळीच मजा असते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
काही पक्षी फुलांवर येणाऱ्या कीटकांना भक्ष्य करण्यात मग्न असतात. सोनसावर आपल्या पिवळ्या धमक फुलांची एक वेगळेच सौंदर्य दाखवून मन मोहून टाकतो.
जंगली बदाम वृक्षात एकीकडे गर्द लाल रंगाच्या पाच ते सहा इंचाचा काजूच्या आकाराचे उकलण्याच्या स्थितीत फळांमधून काळ्याशार गोलसर बियाणे बाहेर उड्या मारण्याची घाई असल्याचा भास होतो.
त्या बरोबरीने नवीन फुलोरा मातकट गुलाबी रंगाचा एक आगळावेगळा निसर्गाचा आविष्कार वाटतो. तसाच काहीसा प्रकार रोहितकबाबतीत गर्द भगव्या रंगाच्या बिया हिरव्या आवरणातून बाहेर पडताना सुंदर दिसतात.
पानगळ झाल्यानंतरचा पांढरा चकचकीत कहांडळचा अवतार पाहण्यात मन हरखून जाते. उन्हाळ्यात बऱ्याच वृक्षांना नवीन पालवी फुटण्यास सुरवात होते. या नवीन पालवीच्या रंगछटा बघण्यात पण एक वेगळाच आनंद असतो.
उन्हाळा संपता संपता बहावा आपल्या फुलांचे झुंबर दाखवून मन जिंकतो ते काही औरच. एकीकडे भोकरला छोटी पण सुगंधी फुलं आलेली असतात. तर पावसाळ्याच्या सुरवातीला बकुळ आपला सुंगधी फुलांनी बहरून जसे काही भोकराला सांगतो.
खूप काही वेगवेगळ्या वृक्षांविषयी सांगण्यासारखे आहे. निसर्गाची सुंदर उधळण बघण्याचा व निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास सुरू करण्याचा मोसम आला आहे. तर, चला मग हे बघण्याचे नियोजन करा व अनुभव लिहून ठेवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.